Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याची चर्चा, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं जातय अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत चर्चा सुरु आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याची चर्चा, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis-Amruta Fadnavis
| Updated on: Aug 18, 2026 | 4:40 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं जातय अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत चर्चा सुरु आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र हे देशातील एक महत्वाचं राज्य आहे. फडणवीसांना इथे सेवा करु द्या. त्यांना दिल्लीत का पाठवताय?. देवेंद्र फडणवीस जबाबदार व्यक्ती आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहिले पाहिजेत” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.नागपूर युथ आयकॉन मंथन फॉर युथ हॅकथोन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अमृता फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उदघाटन झालं. उद्धव ठाकरे गटाकडून सतत देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असा प्रचार सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांनी अमृता फडणवीस यांचं मत जाणून घेतलं. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना ते महाराष्ट्रातच राहणार हे स्पष्ट केलं आहे.

“आज इथे येणं हे माझं सौभाग्य समजते, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना माझ्या शुभेच्छा. सहभागी झालेल्या स्पर्धकांनी विविध आयडियाज सांगितल्या आहेत. तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग, शिक्षण या सर्वांमागे आपला मेंदू(माईंड) आहे. त्याला पण इंटेक्ट ठेवणे आवश्यक आहे. मोदी विकसित भारत प्रमोट करत आहेत,मात्र यासाठी तुमची (तरुणांची) गरज आहे,तुमच्याशिवाय हे शक्य नाही” असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

आता तुमच्या आयडियाज बाहेर येऊ द्या

“यश सर्वकाही नसते,अपयशातूनही शिकायचे असते. मंथन फॉर युथ या अभियानातून मेंटर,गाईड आमच्या मागे आहेत. शाळा,कॉलेजेस,मेट्रो सगळे काही नागपूर देत आहे,आता तुम्हाला तूमच्या शहरासाठी, देशसाठी काही द्यायचे आहे” असं त्यांनी उपस्थितांना आवाहन केलं. “आता तुमच्या आयडियाज बाहेर येऊ द्या,काय चांगले आणि काय नाही याची माहिती हवीय. तुम्ही बदल घडवा,ग्लोबल व्हा, जेंव्हा आपल्यातील शिस्त आणि प्रेम आवश्यक आहे,केवळ त्याला दिशा देण्याची गरज आहे. आज कोणी जिंकेल तर कोणी जिंकणार नाही,पण त्यावरून मार्क डिसाईड होत नाहीत” असं त्या म्हणाल्या. अमृता फडणवीस यांना कलेची खासकरुन गायनाची आवड आहे. त्याशिवाय त्या समाजकार्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us