AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Jantar-Mantar : जंतर-मंतरवर आंदोलन सुरु असताना महिला पत्रकाराचा लैंगिक छळ, ACP वर आरोप

Delhi Jantar-Mantar : निष्पक्ष चौकशीसाठी क्राइम ब्रांचकडे या तक्रारी सोपवण्यात आल्या आहेत. क्राइम ब्रांच या आरोपांची चौकशी करेल. तक्रारदार महिला पत्रकारासह अन्य लोकांची जबानी सुद्धा नोंदवण्यात आली.

Delhi Jantar-Mantar : जंतर-मंतरवर आंदोलन सुरु असताना महिला पत्रकाराचा लैंगिक छळ, ACP वर आरोप
Jantar-Mantar Protest
| Updated on: Oct 04, 2026 | 1:26 PM
Share

दिल्लीच्या जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 3 ऑक्टोंबरला विरोध प्रदर्शन झालं. यावेळी तीन महिला पत्रकारांनी पोलिसांवर लैंगिक छळाचा आरोप केला. तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी हा गुन्हा क्राइम ब्रांचकडे वर्ग केलाय. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. शनिवारी एका महिला पत्रकाराने मीडियाशी बोलताना आरोप केला की, दिल्ली पोलीस दलातील असिस्टेंट कमिश्नर ऑफ पुलिस ACP ने तिचा लैंगिक छळ केला. आंदोलनादरम्यान झालेल्या घटनांसंबंधी आम्हाला तक्रारी मिळाल्या आहेत, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. आंदोलनाच्यावेळी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची तैनाती करण्यात आलेली.

निष्पक्ष चौकशीसाठी क्राइम ब्रांचकडे या तक्रारी सोपवण्यात आल्या आहेत. क्राइम ब्रांच या आरोपांची चौकशी करेल. तक्रारदार महिला पत्रकारासह अन्य लोकांची जबानी सुद्धा नोंदवण्यात आली. एका महिला पत्रकाराने सांगितलं की, ती जंतर-मंतरवर प्रदर्शन कवर करत होती. त्यावेळी एसीपीने तिचा कथित लैंगिक छळ केला. पोलीस प्रदर्शनाच्यावेळी आंदोलकांना ताब्यात घेत होते, त्यावळी तिथे कोणी महिला पोलीस नव्हती. मी दिल्ली पोलिसांचे एसीपी विवेक भगत यांना विचारलं की, “महिला पोलीस का उपस्थित नाहीय? त्यानंतर त्यांनी माझा लैंगिक छळ केला. मला मागे ढकललं”

निर्भीडपणे स्वतंत्र काम करता आलं पाहिजे

या घटनेनंतर महिला पत्रकार अन्य लोकांसह तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. पण अजून पर्यंत या प्रकरणात काहीही कारवाई झालेली नाही असं महिला पत्रकाराने सांगितलं. प्रेस काउंसिल ऑफ इंडियाने आंदोलनस्थळी महिला पत्रकारांसोबत झालेल्या या व्यवहारावर नैराश्य व्यक्त केलं. महिला पोलिसाच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकशाहीत असा व्यवहार सामान्य घटना नाही. महिला पत्रकारांना निर्भीडपणे स्वतंत्र काम करता आलं पाहिजे. वेगवेगळया घटनांचं वृत्तांकन करण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं प्रेस काउंसिल ऑफ इंडियाने म्हटलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...