AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : तमाम अंध भक्तांना सांगतो… उद्धव ठाकरे यांनी चाप ओढलाच, एका फटक्यात अनेक जण घायाळ, टाळ्या आणि शिट्यांचा पाऊस पडला

Raj Thackeray Uddhav Thackeray Garjana Morcha: मुंबईत ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाला तुफान गर्दी उसळली होती. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर उभारलेल्या मंचावर राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे गरजले. त्यांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि पश्चिम बंगालमधील सरकारवर टीकास्त्र डागले.

Uddhav Thackeray : तमाम अंध भक्तांना सांगतो... उद्धव ठाकरे यांनी चाप ओढलाच, एका फटक्यात अनेक जण घायाळ, टाळ्या आणि शिट्यांचा पाऊस पडला
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, गर्जना मोर्चाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 1:28 PM
Share

Uddhav Thackeray : मुंबईत आज ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चात मोठी गर्दी उसळली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या खणखणीत भाषणानंतर सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकेचा मोर्चा उघडला. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर त्यांनी झंझावाती भाषण केले. या भाषणातून त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पश्चिम बंगालचे सरकार आणि कथित अंधभक्तांविरोधात मोर्चा उघडला. भाषणाच्या गोफणीतून अनेक शा‍ब्दिक फटकारे त्यांनी लगावले. त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना मोठा इशाराही दिला.

अमित शाह यांच्यावर तुफान टीका

सरदार वल्लभभाई पटेल यांनी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आणि संपूर्ण हैदराबाद संस्थान देशात सामील करण्यासाठी भारतीय फौजा घुसवल्या होत्या. पण आता अमित शाह यांनी स्वतःचा पक्ष जिंकावा म्हणून पश्चिम बंगालमध्ये एका महिलेविरोधात फौज घुसवली अशी घणाघाती टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगाचे आयुक्त नियुक्त करणाऱ्या समितीत सरन्यायाधीशांना हटवून अमित शाह यांना घेण्यात आले. त्यांनी ज्ञानेश कुमार यांची बेकायदेशीर नियुक्ती केली असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच हल्लाबोल केला.

अंधभक्तांना काय दिला कानमंत्र?

ही तुमची लोकशाही? म्हणून बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की अशी लोकशाही गाडायला पाहिजे. ते दळभद्री लोकशाही, हुकूमशाहीविरोधात बोलत होते. मी तमाम अंध भक्तांना सांगतो, ते चॅनलच्या माध्यमातून आले असतील. अथवा इथंही कुठं तरी असतील. माझं काय जातंय असं त्यांना वाटतं असेल तर तुझंही जातंय असं मला त्यांना सांगायचंय. माझी नजर पुरत नाही तिथपर्यंतच्या या लोकांना हे कळलं आहे. जे मागे अनेकदा बोललो होतो की प्रशासन आणि भाजप या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. भाजपला सरकार चालवता येत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही सरकार चालवत आहात, ते सूड उगवणे आहे. काल ठाण्यात आमच्या पूर्णेकरांची हत्या झाली. पोलीस काय करतायेत, कुठे आहेत गृहमंत्री, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

देशभर महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतं आहेत. कुठे तुमचं हिंदुत्ववादी सरकार, हे तुमचं हिंदुत्व आहे का? आज संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. शेतीवर अवलंबून असलेला अन्नदाता याच्यावर जी परिस्थिती ओढावली, त्याचे आपण कल्पना करू शकत नाही. यांना शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही. यांना एकच उद्योग आहे. ते पक्ष फोडत आहेत. यांनी कसल्या कसल्या चोऱ्या केल्या आहेत. वोट चोरी केली. राम मंदिरातील दानपेटीही चोरली. पक्ष चोराने तुम्ही षंढ आहात. 45 लाख मतदार वाढवले. ज्ञानेश कुमार हे त्यांचे हत्यार आहे. आता मताधिकाराचा हक्क ही त्यांनी चोरला आहे. तुम्ही मत चोरी केली असेल. पण त्यांच्या अजून एक गोष्ट लक्षात आलेली नाही. तुम्ही न्यायसंस्था ताब्यात घेतली असेल. प्रशासन तुम्ही ताब्यात घेतली असेल. हे रस्ते जनतेच्या मालिकेचे आहेत. या रस्त्यावर फिरणं तुम्हाला जिकरीचं होईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

देशात काँग्रेससोबत कधी असं घडलं नाही. ते भाजपने करून दाखवलं. आजपर्यंत देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाला इतक्या शिव्या पडल्या नाहीत, इतक्या या पंतप्रधानांना पडत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. एक काळ असा होता की लोकांना यांच्याविरोधात बोलायला भीती वाटत होती. आता भीती वाटत नाही. तुम्ही जर आमचा मतदानाचा हक्क हिरावून घेत असाल तर आज पाऊल उचललं उद्या हात उचलावा लागेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या सभेतून सत्ताधाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला दिला.

Follow Us
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...