मतदार यादीतील दुबार नावे कमी करण्याचे आवाहन; नाशिककरांच्या मदतीसाठी संकेतस्थळासह टोल फ्री क्रमांक

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधल्या मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आला असून, तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू आहे.

मतदार यादीतील दुबार नावे कमी करण्याचे आवाहन; नाशिककरांच्या मदतीसाठी संकेतस्थळासह टोल फ्री क्रमांक
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधल्या मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आला असून, तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी मतदार यादीत दुबार नाव असल्यास फॉर्म नंबर 7 भरून नाव कमी करून घ्यावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भीमराज दराडे यांनी केले आहे.

मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व 15 मतदार संघात मतदार नोंदणी अधिकारी यांच्यास्तरावर पडताळणीचे काम सुरू आहे. प्राप्त मतदार याद्यांमधील नावांची पडताळणी करण्यासाठी नागरिक, राजकीय पक्ष, अन्य नागरिक व स्वयंसेवी संस्था यांना खात्री करता यावी, यादृष्टीने दुबार मतदारांच्या याद्या www.nashikmitra.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. या याद्यांची यथोचित पडताळणी झाल्यानंतर विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करून नाव वगळण्याबाबत कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर करण्यात येणार असून, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यादीत नमुद मतदारांच्या रहिवासाच्या ठिकाणी भेट देऊन घरोघर तपासणी करणार आहेत. सदर तपासणी दरम्यान सर्व मतदार, नागरिक, राजकीय पक्ष यांनी यादीतील नावांची पडताळणी करावी. दुबार नाव नोंदविले गेले असल्यास ज्या ठिकाणी संबधित मतदाराचा सर्वसाधारण रहिवास आहे, त्या मतदार यादीतील नाव कायम ठेऊन दुसऱ्या मतदार यादीतील नावे तातडीने वगळण्यात यावे. त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे फॉर्म 7 भरून देणे आवश्यक असल्याचेही कळविण्यात आले आहे.

टोल फ्री क्रमांक उपलब्ध

मतदारांना त्यांच्या नावाची खात्री करावयाची असल्यास www.nvsp.in या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, मतदारांना मतदार नोंदणीबाबत अधिक माहिती हवी असल्यास कार्यालयीन वेळेत टोल फ्री क्रमांक 1950 व संबधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भीमराज दराडे यांनी केले आहे.

संस्थानी खातरजमा करावी

मोठ्या औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, उद्योग व बांधकाम क्षेत्र यासारख्या ठिकाणी एकाच छत्राखाली अनेक नागरिक कार्यरत असतात. त्यामुळे अशा आस्थापना चालकांनी आपल्या आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची मतदार यादीत दुबार नाव नोंदणी झालेली नाही याबाबत खातरजमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारीमांढरे यांनी मोठ्या आस्थापना चालकांना केले आहे.

इतर बातम्याः

6 कांदा व्यापाऱ्यांवर 13 ठिकाणी आयकरचे छापे; पिंपळगाव बसवंत येथील कारवाईने खळबळ, कांद्याचे भाव 2500 रुपयांच्या खाली

बहुचर्चित कांदे-निकाळजे वादाची चौकशी पूर्ण; पोलीस आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI