AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुंबईतील या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, विमानतळ आणि..

नुकताच खळबळ उडवणारी माहिती पुढे आलीये. मुंबईतील नायर रूग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीये. नायर रूग्णालयाला धमकीचा मेल आलाय. मात्र, हा मेल कोणी केला, याबद्दल स्पष्टता नाहीये. पोलिस तपास करत आहेत.

मोठी बातमी! मुंबईतील या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, विमानतळ आणि..
mumbai
| Updated on: Sep 07, 2025 | 12:04 PM
Share

विसर्जन मिरवणुकी मुंबईसह पुण्यात अजूनही सुरू आहेत. मुंबईमध्ये गिरगाव चाैपाटीवर मोठी गर्दी भाविकांची आहे. अजूनही लालबागच्या राजाचे विसर्जन झाले नाहीये. तराफ्यावर मुर्ती चढवण्यास अडचणी येत असतानाच आता अजून एक खळबळ उडवणारी बातमी ही पुढे येताना दिसतंय. मुंबईतील नायर रूग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीये. नायर रूग्णालयाला धमकीचा मेल आलाय. मात्र, हा मेल कोणी केला, याबद्दल स्पष्टता नाहीये. सहार विमान तळाला देखील ही धमकी देण्यात आली आहे. सहार विमानतळाच्या शाैचालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलीये.

एकीकडे मुंबईमध्ये बाप्पाच्या विसर्जनाची धावपळ सुरू असतानाच आता दुसरीकडे मात्र बॉम्बने उडवण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने अशाप्रकारच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. या धमकीनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सध्या गिरगाव भागात मोठी गर्दी ही भाविकांची दिसत आहे. लालबाग राजाच्या आरतीसाठी भाविक जमले आहेत.

त्यामध्येच अशाप्रकारचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. आता सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती घेतली जात आहे. अशाप्रकारची धमकी येण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारच्या धमक्या या मिळाल्या आहेत. मात्र, यावेळी थेट नायर रूग्णालयाला आणि विमानतळाला अशाप्रकारचा धमकीचा मेल आला आहे. बऱ्याचदा अशाप्रकारच्या धमक्या या पाकिस्तानमधून दिल्या जात असल्याचे सांगितले जाते. पोलिस या प्रकरणी अधिकचा तपास करत असल्याचीही माहिती मिळताना दिसत आहे.

यापूर्वीही मुंबई पोलिसांनी एक धमकीचा मेसेज आला होता. त्यामध्ये अनंत चतुर्दशीपूर्वी बॉम्बस्फोट होणार असल्याचे या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटले होते. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा आला होता. ‘लश्कर-ए-जिहादी’ या संघटनेचे 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी लगेचच तपास हा सुरू केला होता. आता या गोष्टीला दोन दिवस होत नाहीत तोवरच विमानतळ आणि रूग्णालयाला धमकीचा मेल आल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे खळबळ उडालीये.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.