शेकडो लोकांना तणावमुक्त करणाऱ्या डॉक्टरानेच तणावातून आयुष्य संपवलं, अकोल्यातील दुर्दैवी घटना
अकोल्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरानेच विषारी इजेक्शन घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

अकोल्यामधून मोठी बातमी समोर येत आहे, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर येत आहे. ते अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. त्यांनी आपल्या राहात्या घरी आत्महत्या केली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मानसोपचा तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरी आत्महत्या केली. विषारी इजेक्शन घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. ते अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट
अकोल्यात मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी आपल्या राहात्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. ते अकोल्यातील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते.
अनेकांना केलं तणावमुक्त
डॉ. प्रशांत जावरकर हे अकोल्यामधील एका रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून याच हॉस्पिटलमध्ये कामाला होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये तणावात असलेल्या शेकडो लोकांना समुपदेशन करून तणावमुक्त केलं. मात्र त्यानंतर त्यांनी स्वत:च आत्महत्या केली आहे.
डॉ. प्रशांत जावरकर यांनी आपल्या न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? आत्महत्येमागं नेमकं काय करण होतं? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र त्यांनी कुठल्या तरी तणावातून आपलं आयुष संपवलं असावं अशी चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.