Dharmveer: आनंद दिघे पन्नाशीत गेले, पण ते शंभर वर्षे जगले, मुख्यमंत्र्यांकडून धर्मवीरांना आदरांजली

हा माणूस गेला तेव्हा वय होतं 50. पण दिवस रात्रीचा हिशोब केला तर हा माणूस 100 वर्षे जगला. या माणसाने अशा काही गोष्टी केल्या त्या चमत्कारीक वाटतात. हा चित्रपट केवळ चित्रपट म्हणून न पाहता निष्ठा काय असते पहा. आनंद दिघेंनी शिवसैनिकांच्या धमन्यांत निष्ठा भरली.

Dharmveer: आनंद दिघे पन्नाशीत गेले, पण ते शंभर वर्षे जगले, मुख्यमंत्र्यांकडून धर्मवीरांना आदरांजली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 10:22 PM

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर या चित्रपटाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलरला दिग्गज उपस्थित होते. आनंद दिघे हे ठाणेकरांचं हृदय होतं. आनंद दिघे पन्नाशीत गेले, पण ते शंभर वर्षे जगले असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे आणि धर्मवीर चित्रपटाबाबत (Dharmaveer movies) आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच हा चित्रपट म्हणजे शिवसेनेची झलक आहे. तर शिवसैनिक म्हणजे काय? गुरू आणि शिष्याचं नातं जपणारा जगातिल एकमेव पक्ष हा शिवसेना असल्याचेही त्यांनी सांगितलं. तर गुरू आणि शिष्याची भावना पक्षात असल्यानेच अनेकांचे मनसुब्यांचा पराभव करत शिवसेना पुढे गेल्याचे मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होते.

बाळासाहेबांचा सर्व राग निघून जायचा

तसेच शिवसेना गुरु आणि शिष्याची भावना जपणारा पक्ष असल्यानेच ही भावना अनेक सैनिकांनी पाळली आहे. तर अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली. आनंद दिघे हे पन्नाशीत गेले असले तरिही ते 100 वर्ष जगले. चित्रपटात बाळासाहेब रागवलेले दाखवले तीच परंपरा ठाणेकरांनी राखली आहे. आनंद दिघे नेहमी उशिरा यायचे आणि बाळासाहेब रागवायचे. सकाळी 11 ची वेळ दिली की ठाणेकार कधी येतील हे माहित नसायचे. आणि जेव्हा येतील त्या वेळी त्यांचे 11 वाजलेले असायचे. तर दिघेंबद्दल सांगताना ते म्हणाले की, दिघेंना 11 ची वेळ दिलेली असायची पण ते २ वाजेपर्यंतही येत नसत. पण दिघे साहेब समोर आले की बाळासाहेबांचा सर्व राग निघून जायचा.

हे सुद्धा वाचा

शिवसैनिकांच्या धमन्यांत निष्ठा भरली

तसेच आमच्या अंगार आज्जीसारखे हे सर्व शिवसैनिक आहेत. त्यावेळी बाळासाहेबांना दिघेंसारखे सोबती कार्यकर्ते मिळाले आणि त्यांच्या मुशित तयार झालेले सोबती आज माझ्याबरोबर आहेत. आणखी काय हवे. हा माणूस गेला तेव्हा वय होतं 50. पण दिवस रात्रीचा हिशोब केला तर हा माणूस 100 वर्षे जगला. या माणसाने अशा काही गोष्टी केल्या त्या चमत्कारीक वाटतात. हा चित्रपट केवळ चित्रपट म्हणून न पाहता निष्ठा काय असते पहा. आनंद दिघेंनी शिवसैनिकांच्या धमन्यांत निष्ठा भरली.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.