प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेवर अनिल पाटलांचे थेट विधान, म्हणाले, असे कोणाच्याही..

प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याचा सल्ला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. त्यावरच आता मोठे विधान अनिल पाटील यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेवर अनिल पाटलांचे थेट विधान, म्हणाले, असे कोणाच्याही..
Anil Patil
| Updated on: Aug 11, 2026 | 1:09 PM

प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यास सांगितल्याची चर्चा आहे. 6 तास प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात बैठक झाली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. आता प्रदेशाध्यक्ष बदल्याच्या मुद्द्यावर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल पाटील यांनी म्हटले की, कुणाच्या सल्ल्याने प्रदेशाध्यक्ष बदलला जात नाही. प्रदेशाध्यक्ष बदलाचा कोणाताही संबंध नाही,
प्रशांत किशोर यांनी तशा सूचना दिल्या असं वाटत नाही. हा पक्षांतर्गत विषय, राष्ट्रीय अध्यक्ष ते ठरवतात. अनिल पाटील यांनी म्हटले की, प्रदेशाध्यक्ष बदलायचा सूत्रांचा सुद्धा संबंध नाही. राहिला प्रश्न प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या सूचना प्रशांत किशोर यांनी दिल्या, पण मला असे अजिबात वाटत नाही की, त्यांनी अशा सूचना दिल्या.

कोणाच्या सल्ल्यानुसार, प्रदेशाध्यक्ष बदलला जातो, असेही कधी होत नसते. हा पक्षाचा अंतर्गत मामला आहे, पक्षाचा अंतर्गत विषय आहे. ही जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्षांची आहे. मला माध्यमांच्या माध्यमातून ही बाब समजली की, सूत्रांच्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील होतील, अशी माहिती तुम्हाला सूत्रांकडून मिळालेली असते, तशे माझेही सूत्र आहेत.

माझ्या सूत्रांच्या माध्यमातून मला असे वाटते की, प्रदेशाध्यक्षाच्या पदाची चर्चा कुठेही झालेली नाही. पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून राहण्यात मला सर्वात जास्त आनंद आहे. कार्यकर्ता म्हणून पक्षाने काम करण्याची संधी मला वारंवार द्यावी, अशी इच्छा आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याबाबत जोरदार चर्चा या रंगताना दिसत आहेत.

यावरच आता अनिल पाटील यांनी भाष्य केले. अनिल पाटील नवे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, अशा चर्चा रंगताना दिसल्या, यावर अनिल पाटील यांनी भाष्य केले. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करायला कधीही आवडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबत विविध चर्चा आहेत. प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांना काढण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जाते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us