AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा हादरा; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता शिवसेनेच्या बड्या नेत्यानं राजीनामा दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा हादरा; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
uddhav thackeray
| Updated on: Jan 20, 2025 | 5:52 PM
Share

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ  पवार यांनी राजीनामा दिला आहे. एकनाथ पवार यांचा राजीनामा हा  शिवसेना ठाकरे गटासाठी नांदेडमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार देखील होते.

भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता  

नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ  पवार यांनी राजीनामा दिला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार होते. मात्र त्यांनी आता राजीनामा दिला असून, ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी देखील मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा आहे. त्यामुळे 23 जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. शिवसेना आणि काँग्रेसचे दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्याबद्दल गौप्यस्पोट केला होता. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वीच उदय सामंत हे शिंदे गटातून वेगळं होणार होते, तेव्हाच शिंदे गटात फूट पडणार होती असं त्यांनी म्हटलं होतं.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता राहुल शेवाळे यांनी हा दावा केला आहे.  23  तारेखेला राज्यात मोठा भूकंप होणार असून, काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात, याचीच कुणकुण लागल्यामुळे संजय राऊत यांनी असं वक्तव्य केल्याचं शेवाळे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?