AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात आणखी एक परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांचा संताप, आता या तारखेला पुन्हा होणार परीक्षा

शासनाच्या बार्टी (BARTI), आर्टी (ARTI), सारथी (SARTHI) आणि अमृत या संस्थांच्या वतीनं एमपीएससी करिता पूर्व तयारी परिक्षेकरीता मोफत मार्गदर्शन मिळावं, यासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत मोठा गोंधळ उडाला आहे.

राज्यात आणखी एक परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांचा संताप, आता या तारखेला पुन्हा होणार परीक्षा
आणखी एक परीक्षा रद्द Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 10:09 PM
Share

शासनाच्या बार्टी (BARTI), आर्टी (ARTI), सारथी (SARTHI) आणि अमृत या संस्थांच्या वतीनं एमपीएससी करिता पूर्व तयारी परिक्षेकरीता मोफत मार्गदर्शन मिळावं, यासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. भंडारा जिल्ह्याच्या भंडारा आणि साकोली अशा दोन परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु भंडारा येथील नूतन महाराष्ट्र विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला.  या निमित्ताने पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. यावेळी परीक्षार्थ्यांमध्ये मोठा उद्रेक बघायला मिळाला.

या परीक्षेकरिता भंडारा जिल्ह्यासह लगतच्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि अन्य जिल्ह्यातूनही शंभर पेक्षा अधिक परीक्षार्थी भंडाऱ्यात पोहोचले होते. दुपारी साडेचार वाजता सुरू झालेल्या परीक्षेदरम्यान भंडाऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर पावसामुळे परीक्षा केंद्रावरील वीज पुरवठा खंडीत झाला.  दरम्यान परीक्षा केंद्रावरील जनरेटरही बंद असल्यानं परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींनी मोठा गोंधळ घातला. विद्यार्थ्यांचा गोंधळ बघता या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं तात्काळ बार्टीचे मुख्यालय पुणे येथे संपर्क साधून, आजची परीक्षा रद्द करून ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 24 सप्टेंबर रोजी होणार आहे.

विद्यार्थ्यांना मनस्ताप 

दरम्यान या परीक्षेसाठी विद्यार्थी दूरवरून भंडारा येथील नूतन महाराष्ट्र विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर आले होते. परंतु परीक्षा सुरू असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे लाईट देखील गेली. परीक्षा केंद्रावर लाईटची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच संताप झाला, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ घातला. दुरूवरून मुलं या परीक्षेसाठी आली होती. या मुलांचा वेळ तर वाया गेलाच परंतु त्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?