AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेसविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार, महाराष्ट्रातील 300 पेक्षा अधिक एपीएमसी मार्केटचा कडकडीत बंद

केंद्र सरकारने सूट देऊनही महाराष्ट्र सरकारने एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर लावलेल्या सेसविरोधात व्यापारी आक्रमक झालेत (APMC Traders strike against cess).

सेसविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार, महाराष्ट्रातील 300 पेक्षा अधिक एपीएमसी मार्केटचा कडकडीत बंद
| Updated on: Aug 26, 2020 | 12:40 AM
Share

नवी मुंबई : केंद्र सरकारने सूट देऊनही महाराष्ट्र सरकारने एपीएमसीमधील व्यापाऱ्यांवर लावलेल्या सेसविरोधात व्यापारी आक्रमक झालेत (APMC Traders strike against cess). राज्यातील 300 पेक्षा अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी (APMC) आज कामबंद आंदोलन केलं. यात मुंबईतील सर्व एपीएमसी मार्केट, नवी मुंबई, पुणे, बारामती, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, मनमाड, सातारा, नीरा, फलटण, लातूर, बार्शी, अमळनेर, शिरपूर, नंदुरबार, नांदेड, अहमदनगर या सर्व मार्केटने 100 टक्के बाजार बंद ठेवत सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

पुण्यातील व्यापारी असोसिएशन, महाराष्ट्र व्यापार फेडरेशन, चेंबर ऑफ असोसिएशन या सर्व व्यापारी संघटनांनी राज्य सरकारला सेस हटवण्याची मागणी केली आहे. वारंवार मागणी करुनही सरकारने दुर्लक्ष केल्याने अखेर व्यापाऱ्यांनी राज्यस्तरीय बंद पुकारला. याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील सर्व एपीएमसी मार्केट आज (25 ऑगस्ट 2020) पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार व्यापाऱ्यांना एपीएमसी वस्तूंच्या व्यवहारातील बाजारपेठ शुल्कातून सूट देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप अजूनही व्यापाऱ्यांवर 1 टक्के सेस आकारणे सुरुच ठेवले आहे. याचविरोधात व्यापाऱ्यांनी बंदचा मार्ग निवडला होता.

राज्य शासनाकडे कायम पाठ पुरावा करुनही एपीएमसीमधील कृषी उत्पन्नावर लावण्यात आलेल्या एक टक्का बाजार शुल्क रद्द करण्यात आलेला नाही. तो सरकारने तात्काळ रद्द करावा. केंद्र शासनाने एपीएमसी संदर्भात नवीन कायदा आणला आहे. त्यात एपीएमसीच्या बाहेर होणाऱ्या खरेदीवरील सेस हटवला आहे. त्यामुळे एपीएमसीमधील व्यापाऱ्यांना लावण्यात येणारा सेसही रद्द करावा, अशी मागणी व्यापारी करत आहे.

केंद्र सरकारच्या नव्या धोरणापासून एपीएमसीमधील सेस हटवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. त्याविरोधातच व्यापाऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बंद पुकारला.

संबंधित बातम्या :

मालवाहतुकीची दरवाढ, ट्रकऐवजी थेट एसटीतून 12 टन कांदा वाहतूक, नगरवरुन APMC मध्ये कांदा दाखल

तांदूळ घेऊन आलेले ट्रकचालक उपाशी, नवी मुंबईत भुकेले ट्रकचालक मेटाकुटीला

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 51 वर, मुंबई एपीएमसीतील मार्केट ‘कोरोना हॉटस्पॉट’च्या वाटेवर?

Traders strike against state cess in Maharashtra

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.