AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट, सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती

वैष्णवी हगवणे प्रकरणात सरकारी वकील म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे, याबद्दल वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट, सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती
| Updated on: May 29, 2025 | 7:27 PM
Share

पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्याचा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली आहे. दरम्यान आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात आर. आर. कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आर. आर. कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केली होती.

आर आर कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याबद्दल अनिल कस्पटे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून कस्पटे यांच्याशी संवाद साधला असताना, कस्पटे यांनी सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकरणात सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दुसरीकडे वैष्णवीची सासू लता हगवणे नणंद करिष्मा आणि पती शशांक यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे,  त्यांना जामीन मिळू नये अशी इच्छा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी यावेळी व्यक्त केली.

शशांक हगवणेच्या अडचणीत वाढ 

वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक हगवणे याला अटक करण्यात आली आहे, तो आता न्यायालयीन कोठडीत आहे, वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना न्यायालयानं आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान शशांक हगवणे याचं आणखी एक प्रकरण समोर आलं असून, त्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे. त्याच्याविरोधात फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?  

शशांक हगवणे याच्यावर जेसीबीच्या  व्यवहार प्रकरणी 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशांत येळवंडे यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत