AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जस जसा वेळ जातोय, तस तसा संशय… अजितदादा अपघात प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं विधान

Manoj Jarange : अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. आता मनोज जरांगे पाटलांनीही या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

जस जसा वेळ जातोय, तस तसा संशय... अजितदादा अपघात प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं विधान
Jarange and PawarImage Credit source: Google
| Updated on: Feb 23, 2026 | 10:14 PM
Share

बारामती विमानतळाजवळ 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित पवारांसह एकूण 5 जणांचा या अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यातील अनेक नेत्यांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोपही केले आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटलांनीही या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. अजित दादांच्या विमान अपघातावर बोलताना जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

जस जसा वेळ जातोय, तस तसा संशय…

मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठं विधान केलं आहे. जरांगे पाटील म्हणाले की, दादांच्या जाण्याने सगळ्यांचे खूप मोठे वाटोळे झाले आहे. कुटुंबाला संशय असेल तर चौकशी झाली पाहिजे. चौकशी केली काय? नाही केली काय? दादा परत येणार नाहीत. दादांनी जातीवाद केला नाही, ते सगळ्या जातीचे होते. आधी काही वाटत नव्हतं. मात्र जसा वेळ लागायला लागला तसे प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्राचे नुकसान कोणी भरून काढू शकत नाही.

रोहित पवार यांचा सरकारला इशारा

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल ब्लॅक बॉक्सच्या तपासणीनंतर समोर येणार आहे. मात्र हा बॉक्स जळालेल्या अवस्थेत होता अशी माहिती समोर आली आहे. यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, ‘ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आलेला आहे. तो कसा आहे? किती जळालेला आहे याचीही माहिती आमच्याकडे आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय याची कसा तपास करते याची आम्ही वाट पाहत आहोत. अधिवेशनाच्या निमित्ताने मी सरकारमधील लोकांना सांगू इच्छितो की, आम्ही आतापर्यंत फक्त 20 ते 30 टक्के माहिती दिली आहे. आमच्याकडे आणखी 70 टक्के माहिती आहे. त्यामुळे तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि जर त्यात काही काळंबेरं झालं तर सरकारला महागात पडेल.’

28 फेब्रुवारी पूर्वी विमान अपघाताचा अहवाल येणार

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 फेब्रुवारी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले की, ‘अजित पवार पवार यांच्या विमान अपघाताचा 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार आहे.’ आता या अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...