राष्ट्रवादीमुळे सुजय विखेंना काँग्रेस सोडावी लागल्याची अशोक चव्हाणांना खंत

नांदेड : सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी धक्का मानला जातो. पण हा धक्का नाही. राजकारणात  कमी-जास्त प्रमाणात अशा गोष्टी घडत असतात. यामुळे काँग्रेसला फारसा फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. मात्र सुजय यांचा भाजप प्रवेश दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची फोडाफोडीची नीती लोकशाहीला मारक आहे. त्यांची साम […]

राष्ट्रवादीमुळे सुजय विखेंना काँग्रेस सोडावी लागल्याची अशोक चव्हाणांना खंत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नांदेड : सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी धक्का मानला जातो. पण हा धक्का नाही. राजकारणात  कमी-जास्त प्रमाणात अशा गोष्टी घडत असतात. यामुळे काँग्रेसला फारसा फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. मात्र सुजय यांचा भाजप प्रवेश दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची फोडाफोडीची नीती लोकशाहीला मारक आहे. त्यांची साम दाम दंड भेदाची ही नीती असल्याचं चव्हाण म्हणाले. सुजयने थोडा विचार करायला हवा होता. शिवाय राष्ट्रवादीने सामंजस्याची भूमिका घेतली असती तर हा प्रसंग आला नसता, अशी खंत देखील अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील सध्या राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे मुलाच्या भाजप प्रवेशाचा वडिलांवर काही परिणाम होणार का याबाबत अशोक चव्हाणांना विचारण्यात आलं. यावरही त्यांनी उत्तर दिलं. या बाबतीत मी काही बोलू शकणार नाही, पण या पक्ष प्रवेशाची दखल पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली आहे. याबाबतीत त्यांनी आपल्याशी चर्चा केल्याचं चव्हाण म्हणाले.

“बहुजन वंचित आघाडीसाठी आमची दारं अजूनही खुली”

येत्या 15 तारखेला बहुजन वंचित आघाडीच्या सर्व 48 जागा जाहीर करणार असल्याचं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. मात्र बहुजन वंचित आघाडीसाठी आमची दारे आणि खिडक्या अजून उघड्या आहेत. त्यांनी फेरविचार करावा आणि महाआघाडीत यावं अशी आपली जाहीर विनंती बाळासाहेबांना असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. आम्ही अजूनही जागावाटपाबाबत निर्णय घेतला नाही. त्यांनी विचार करावा. बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे शिवसेना-भाजपला फायदा होणार आहे. शिवसेना-भाजप विरोधात लढायचं असेल आणि त्यांचा फायदा होऊ द्यायचा नसेल तर आंबेडकर यांनी थोडी नरमती भूमिका घ्यावी, असं अशोक चव्हाण म्हणाले.

“राजू शेट्टींना दोन जागा देणार”

राजू शेट्टी यांनी तीन जागांची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मागणी केली. पण त्यांना एकूण दोन जागा देण्याचं आम्ही मान्य केल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. राजू शेट्टी आणि आपली याबाबतीत चर्चा झाली. राजू शेट्टींनी महाआघाडीत यावं यासाठी आपण आग्रही असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

नांदेडमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?

अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधून लोकसभा कोण लढणार याबाबत अजून उत्सुकता आहे. अशोक चव्हाण यांच्या जागी त्यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांनी लोकसभा लढवावी अशी एकमुखी मागणी जिल्हा काँगेसने केली. मध्यतंरी नांदेडमध्ये आलेल्या पक्ष निरीक्षकाकडे देखील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेव अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीची मागणी केली. मात्र नांदेडचा उमेदवार अजून ठरला नसल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. पक्षाने सांगितले तर मला लोकसभा लढवावी लागेल, असं अशोक चव्हाण म्हणाले. स्वतःच्या उमेदवारीचे संकेत देऊन त्यांनी संभ्रम कायम ठेवला.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.