AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तेव्हा लोक माझ्या कानात…’; अशोक चव्हाण रोहित पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?

राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नांदेडमध्ये त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

'तेव्हा लोक माझ्या कानात...'; अशोक चव्हाण रोहित पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 13, 2025 | 5:11 PM
Share

राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नांदेडमध्ये त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदर अशोक चव्हाण, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, आमदार बाबुराव कदम, भाजपाचे आमदार श्रीजया चव्हाण यांची उपस्थिती होती.  धनगर समाज व महायुतीच्या वतीनं या सत्काराचं आयोजन करण्यात आलं, या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?

राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती नियुक्ती करण्यात आलेली नाही, तर त्यांची त्या पदावर बिनविरोध निवड झाली आहे. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही बिनविरोध निवडून आलात. राम शिंदे यांचा अनुभव दांडगा आहे, ग्रामपंचायतपासून ते विधानसभा, मंत्री आणि आज ते सभापती झाले आहेत.

असं म्हणतात मुंबईच्या काळबादेवी परिसरात गाडी चालवली की तो चालक कुठेही गाडी  चालवू शकतो. एवढी ट्राफिक त्याठिकाणी असते, तसेच जो अहिल्यानगर जिल्ह्यातून निवडून येऊ शकतो, तो कुठेही निवडून येऊ शकतो. आगामी काळात ते पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्यानं विधानसभेत निवडून येतील. सभागृहाची उंची वाढविण्यासाठी सभापती हा महत्त्वाचा आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. मला जेव्हा रोहित पवारांनी बोलावलं होतं, तेव्हा मी कर्जत जामखेड मतदारसंघात गेलो होतो तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो. पण तेव्हा लोक मला कानात सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस राम शिंदेंच आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

नांदेडमध्ये कृषी महाविद्यालय झाले पाहिजे, यासाठी मी चीफ सेक्रेटरी यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा चीप सेक्रेटरी म्हणाले, हे होणार नाही. मी त्यांना सांगितलं निर्णय मुख्यमंत्री घेत असतात चीप सेक्रेटरी नाही. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी यासंदर्भात निगेटिव्ह शेरा दिला होता. त्यानंतर आमचं सरकार गेलं. शेवटी ती फाईल पुढे आमदार बालाजी कल्याणकर यांनी नेली आणि एकनाथ शिंदे यांनी ते काम केलं, असंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा