AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: अशोक खरातचा अजून एक प्रताप, थेट EVM वर जादूटोणा, प्रकरण तरी काय?

Ashok Kharat EVM : अशोक खरातचा अजून एक प्रताप समोर आला आहे. रत्न आणि राशी खड्यात त्याने एका व्यावसायिकाची मोठी फसवणूक केली आहे. तर एका लोकप्रतिनिधीसाठी त्याने थेट मतदान यंत्रावर जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. काय आहे अपडेट?

Ashok Kharat: अशोक खरातचा अजून एक प्रताप, थेट EVM वर जादूटोणा, प्रकरण तरी काय?
अशोक खरात ईव्हीएमImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 9:57 AM
Share

Ashok Kharat EVM : भोंदू बाबा अशोक खरातचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. अंधश्रद्धा व फसवणुकीच्या प्रकरणामुळे खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याने एका व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील राजेंद्र भागवत यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. व्यवसाय वृद्धीच्या नावाखाली खडे-रत्न देण्याचा बहाणा खरात याने केला. त्याने तक्रारदाराची 20 ग्रॅम सोन्याची अंगठी स्वतःकडे ठेवून बनावट अंगठी दिल्याचा आरोप भागवत यांनी केला आहे. पितळी अंगठीत पुष्कराज व हिऱ्याचे रत्न असल्याचे सांगून फसवणूक केली. खरात याने भागवत यांची तब्बल 2 लाख 62 हजारांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. खरात याने 75 हजारांचा पुष्कराज रत्न विकल्याचाही आरोप त्यांनी केला. तक्रारदाराकडील दोन सोन्याच्या अंगठ्या घेतल्या, मात्र रत्नजडित नावाखाली बनावट अंगठी दिली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

थेट मतदान यंत्रावर जादूटोणा

भोंदू अशोक खरातच्या संपर्कात सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी असल्याचा अनिसने गंभीर आरोप केला. याच लोकप्रतिनिधीने निवडणुक झाल्यानंतर नाशिकच्या अंबड येथे ठेवण्यात येणार मतदान यंत्र सुरक्षित राहावे म्हणून जादूटोणा केला होता. हा जादूटोणा खरात याने केला तरी नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे. शिवाय दुसर्‍याने त्याच्या मतदान यंत्रावर जादूटोणा करून त्याचे मते चोरू नये यासाठी खाजगी सुरक्षा रक्षक नेमले होते. या लोकप्रतिनिधीच्या प्रचारात भोंदू बाबा अशोक खरात 1999 पासून काम करत असल्याचे आरोपही अनिसने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची देखील अनिसने मागणी केली.

भोंदू खरात 10 दिवसांपासून कोठडीत

भोंदू अशोक खरात गेल्या 10 दिवसांपासून पोलिस कोठडीत आहेत. या कोठडीत त्याला चांगला प्रसाद मिळाल्याचे समोर आले आहे. दैवी शक्ती अंगात संचारत असल्याचा दावा करणाऱ्या भोंदूची चांगली वरात पोलिसांनी काढली. एसआयटीसह इतर यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत. मिरगाव येथील शिवनिका देवस्थाच्या विश्वस्त आणि पुजाऱ्यांचाही चौकशी करण्यात आली आहे. एकीकडे चौकशीचा सिसेमिरा असल्याने दुसरीकडे इशान्येश्वर महादेवाची पूजा मात्र नित्यनियमाने सुरू आहे. शिवनिका संस्थानचा पुजारी दररोज इथं पूजा करत आहे. सध्या देवस्थानात केवळ एकमेव पुजारी आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.