AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी मोठा ट्विस्ट, मुलाने सर्वच सांगितलं, म्हणाला आमच्या घरी…

अध्यात्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलाने SIT चौकशीत घरात येणाऱ्या अमाप रोकडबद्दल धक्कादायक कबुली दिली आहे, ज्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी मोठा ट्विस्ट, मुलाने सर्वच सांगितलं, म्हणाला आमच्या घरी...
ashok kharat
| Updated on: Apr 03, 2026 | 11:00 AM
Share

अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता एक नवे आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) अशोक खरात भोवती तपासाचा फास आणखी आवळला आहे. त्यातच आता अशोक खरातच्या मुलाने चौकशीत दिलेली कबुली या प्रकरणातील सर्वात मोठा दुवा ठरण्याची शक्यता आहे. यामुळे अशोक खरातच्या घरात येणारी अमाप रोकड आणि त्याचे कनेक्शन आता पोलिसांच्या रडारवर आले आहे.

अशोक खरातच्या मुलाचा खळबळजनक खुलासा

SIT ने अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या मुलाने सुरुवातीला मौन बाळगले होते. मात्र प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर त्याने धक्कादायक माहिती दिली. आमच्या घरात मोठ्या प्रमाणावर कॅश यायची. हे पैसे कुठून आणि कसे येत होते, याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्याचे सर्व नियंत्रण डॅड अशोक खरात यांच्याकडे होते. त्यांना प्रत्येक व्यवहाराची इत्यंभूत माहिती होती, अशी कबुली अशोक खरातच्या मुलाने दिली आहे. यावरून खरातच्या घरात पैशांचा महापूर वाहत होता आणि त्यामागे मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट होत आहे.

हवाला रॅकेट आणि आर्थिक साम्राज्याची चौकशी

मुलाने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना आता हवाला रॅकेटचा प्रबळ संशय आहे. भक्तांकडून घेतलेले पैसे आणि इतर संशयास्पद मार्गाने आलेली संपत्ती पांढरी करण्यासाठी खरातने कोणते मार्ग वापरले, याचा शोध घेतला जात आहे. यासाठी ईशान्यश्वर मंदिराच्या शिवनिका संस्थान मधील तीन संचालकांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत अनेक आर्थिक विसंगती समोर आल्या आहेत. या संस्थांच्या नावाखाली चालणारे हे आर्थिक व्यवहार म्हणजे काळा पैसा लपवण्याचे केंद्र होते का? याचा तपास आता सुरू झाला आहे.

भाविकांच्या श्रद्धेचा बाजार आणि लैंगिक शोषण

दरम्यान अशोक खरातने केवळ आर्थिक लूटच केली नाही, तर भक्तांच्या श्रद्धेशी क्रूर खेळ मांडला होता. देवाचा कोप होईल किंवा घरावर संकट येईल अशी भीती घालून तो पूजेच्या नावाखाली लाखो रुपये उकळत असे. याच भीतीचा फायदा घेऊन त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचेही निष्पन्न झाले आहे. भक्तांकडून मिळालेल्या पैशातून त्याने मोठी मालमत्ता आणि माया जमवली असून, SIT आता त्याच्या सर्व बँक खात्यांची आणि मालमत्तेची कागदपत्रे तपासत आहे.

त्यातच आता खरातच्या मुलाने दिलेल्या कबुलीमुळे आता या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच SIT कडून आता शिवनिका संस्थानचे आर्थिक ऑडिट केले जाणार असून, लवकरच या प्रकरणातील आर्थिक गुन्हेगारीचा मोठा खुलासा होण्याची शक्यता नाशिक पोलीस वर्तुळात वर्तवली जात आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?