AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू बाबा अशोक खरातशी लागेबांधे भोवले, चाकणकरांपाठोपाठ बड्या अधिकाऱ्याने रातोरात गमावले पद, कनेक्शन काय?

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SRA उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती रद्द करून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. खरातशी आर्थिक व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

भोंदू बाबा अशोक खरातशी लागेबांधे भोवले, चाकणकरांपाठोपाठ बड्या अधिकाऱ्याने रातोरात गमावले पद, कनेक्शन काय?
ashok kharat
| Updated on: Mar 25, 2026 | 8:06 AM
Share

सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आले होते. आता या राजकीय नेत्यांनंतर प्रशासकीय अधिकारीही अडचणीत आले आहेत. शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप असलेल्या खरातशी संबंध असल्याच्या संशयावरून मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (SRA) उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्रशासकीय कारवाईचा बडगा

महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने २४ मार्च २०२६ रोजी विशेष आदेश जारी केला आहे. त्यानुसार, मुंबईतील वांद्र्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती लोकहितास्तव तातडीने संपुष्टात आणली आहे. त्यांना २४ मार्चच्या दुपारनंतर सध्याच्या पदावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांना मंत्रालयातील महसूल व वन विभागात तात्काळ रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अशोक खरातशी आर्थिक लागेबांधे?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अभिजीत भांडे पाटील यांचे अशोक खरातशी जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. खरातच्या पत्नीच्या आणि मुलीच्या नावे असलेल्या जमिनींमध्ये भांडे पाटील यांनी गुंतवणूक केल्याचा संशय वर्तवला जात आहे. खरातशी संबंधित अनेक व्यवहारांमध्ये या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे खरातच्या संपर्कात असलेल्या इतर महसूल अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

राजकीय धागेदोरेही चर्चेत

याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. खरातच्या एका ट्रस्टमध्ये त्या संचालिका होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या सर्व राजकारणी आणि अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान अशोक खरातच्या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट होत आहे. खरातने एल्विश हनी (Elvish Honey) नावाचे मध तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतून आणल्याचा बनाव करून चक्क ९ लाख रुपये प्रति किलो दराने विकल्याचे समोर आले आहे. लैंगिक समस्या असलेल्या लोकांना हे मध शक्तिवर्धक असल्याचे सांगून लुटले जात होते. यातून मिळालेला काळा पैसा विविध ट्रस्टच्या नावावर वळवून तो पांढरा (White Money) करण्याचा खरातचा प्रयत्न होता.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!