AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू बाबा अशोक खरातच्या केबिनमधील काळ्या काचा कोणत्या कंपनीच्या? महत्त्वाची अपडेट समोर

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या आलिशान ऑफिसमधील रिफलेक्टिव्ह काचांचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. तसेच शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्यातही खरातचा हात असल्याचा संशय असून, राजकीय वरदहस्ताने हे सर्व कारनामे केल्याचे आरोप होत आहेत.

भोंदू बाबा अशोक खरातच्या केबिनमधील काळ्या काचा कोणत्या कंपनीच्या? महत्त्वाची अपडेट समोर
ashok kharat (
| Updated on: Mar 30, 2026 | 12:23 PM
Share

भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनामे थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अत्याचार, सक्तीने गर्भपात, खंडणी आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर आता अशोक खरातच्या नाशिकच्या अलिशान ऑफिसमधील काळ्या काचांबद्दल जोरदार चर्चा रंगली आहे. अशोक खरातच्या याच केबिनमध्ये महिलांचे शोषण होत असल्याचे गंभीर आरोप केला जात होता. आता या ऑफिसच्या रचनेबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या केबिनला बसवलेल्या काचा साध्यासुध्या नसून त्या रिफलेक्टीव्ह ग्लास (Reflective Glass) आहेत. ग्लास एक्सपर्ट आणि व्यावसायिक अनिल सोमवंशी यांनी या काचांचा प्रत्यक्ष डेमो देऊन त्यामागचे सत्य उघड केले आहे. या काचा बाहेरच्या बाजूने केवळ आरशाप्रमाणे दिसतात. त्यामुळे बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला आत काय चालले आहे, याचा साधा अंदाजही बांधता येत नाही.

पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केबिनच्या आत बसलेल्या व्यक्तीला बाहेर कोण काय करतंय, या सर्व हालचाली स्पष्टपणे दिसतात. जर केबिनच्या आतील लाईट बंद केली, तर बाहेरील व्यक्तीला आतील हालचाली अजिबातच दिसत नाहीत. या अशा पद्धतीच्या काचांची निर्मिती सेंट गोबेन आणि असाही यांसारख्या नामांकित कंपन्यांकडून केली जाते. या तंत्रज्ञानाचा वापर करूनच अशोक खरातने आपल्या काळ्या कृत्यांवर पडदा टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शिक्षण विभागात खळबळ

तर दुसरीकडे अशोक खरातने एक मोठा घोटाळा केल्याचेही समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठा सहभाग असण्याची शक्यता आहे. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. २०२२ मध्ये जेव्हा दीपक केसरकर शिक्षणमंत्री होते, तेव्हा अशोक खरातने आपल्या राजकीय वजनाचा वापर करून भाऊ दिलीप खरात याला शालार्थ आयडी मिळवून दिल्याचा आरोप होत आहे.

दिलीप खरात हा सिन्नर तालुक्यातील बारागांव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. दिलीप खरातला मिळालेला हा आयडी खरा आहे की बोगस? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शिक्षण विभागात मध्यस्थांमार्फत अनेक फाईल्स खरातने निकाली काढल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. या सर्व प्रकरणांमुळे शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनासमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राजकीय वरदहस्तामुळे अशोक खरातने हे सर्व साध्य केले का? याचा शोध आता घेतला जात आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...