AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या आधारावर पक्षप्रमुख होतील, शिंदे गटाच्या नेत्याचा उद्धव ठाकरे यांना सवाल

ठाकरे यांच्याकडं १५-१६ आमदार आहेत. ५ खासदार उरले आहेत. त्यामुळं त्यांनी दिवास्वप्न पाहू नये. शेवटचे हातपाय हलवत आहेत.

कोणत्या आधारावर पक्षप्रमुख होतील, शिंदे गटाच्या नेत्याचा उद्धव ठाकरे यांना सवाल
उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jan 11, 2023 | 9:34 PM
Share

मुंबई : २३ जानेवारीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा शेवटचा दिवस आहे. प्रतिनिधी सभा घेण्याची परवागनी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात बोलताना शिंदे गटाचे प्रदोत भरत गोगावले म्हणाले, परवानगी मागितली हेच हास्यास्पद वाटते. २८२ सदस्य आहेत. १७५ हे आमच्याकडं आहेत. १०७ त्यांच्याकडं आहेत. १७५ आमच्याकडं असताना हे कोणत्या आधारावर पक्षप्रमुख होऊ शकतात, असा सवाल भरत गोगावले यांनी विचारला. आता त्यांनी मागणी करावी लागते. मुळात जे होते ते बेकायदेशीर होते.

प्रतिनिधी सभा घेण्याची उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे. पण, ती मागणी पूर्ण होणार नाही. कारण त्यांच्यावर आमचा आरोप राहणार असल्याचं भरत गोगावले म्हणाले. आता शिंदे गट मैदानात उतरला आहे. ही लढाई आऱपारची असणार आहे.

२२ लाख सदस्य संख्या असल्यानं मुळची शिवसेना आमची असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. आमच्याकडं ४० आमदार, १३ खासदार आणि कितीतरी आमचे पदाधिकारी आहेत. हे सगळं पाहिल्यास ही संख्या जास्त जाऊ शकते, असं भरत गोगावले यांनी सांगितलं.

ठाकरे यांच्याकडं १५-१६ आमदार आहेत. ५ खासदार उरले आहेत. त्यामुळं त्यांनी दिवास्वप्न पाहू नये. शेवटचे हातपाय हलवत आहेत. त्यांनी आता गप्प बसावं असा सल्ला भरत गोगावले यांनी दिला.

आताच्याकाही अडचणी आहेत. त्यावर मात करत आम्ही जात आहोत. ठरलेल्या फार्म्यूल्यानुसार सर्व होईल. काही ठिकाठी तडजोडी कराव्या लागतात.

ईडीची रेड सुरू आहे. पोलीस आणि कार्यकर्ते यांच्या धुमश्चक्री पाहायला मिळाली. अजित पवार म्हणतात, भाजप सुडाचं राजकारण करते. यावर बोलताना भरत गोगावले यांनी सांगितलं की, काहीच नसेल तर घाबरायचं काही कारण नाही.  ज्या कर नाही त्याला डर कशाला. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना.

शरद पवार साहेब ईडीला सामोरे गेले होते. त्यावेळी काही झालं नाही. मुश्रीफ यांनीही सामोरे जावं.

अयोध्या दौरा साहेब सांगतील तेव्हा होईल. मंत्रीपद मिळणार हे ठरलेलं आहे. त्यात काही दुमत नसल्याचंही भरत गोगावले म्हणाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे. तोही रायगडच्या पालकमंत्री पदासह त्यामुळं त्यावर दुमत असण्याच कारण नाही.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....