महायुतीची विधानसभा उमेदवारांची यादी एकत्र नाहीच…प्रत्येक पक्ष करणार स्वत:ची यादी, भाजपची यादी कोणत्याही क्षणी

maharashtra assembly election 2024: आमची पहिली यादी कधीही येऊ शकते. लवकर येऊ शकते. आमच्या पद्धतीनुसार दिल्लीतील भाजपचे केंद्रीय मंडळ ही यादी जाहीर केली, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महायुतीची विधानसभा उमेदवारांची यादी एकत्र नाहीच...प्रत्येक पक्ष करणार स्वत:ची यादी, भाजपची यादी कोणत्याही क्षणी
devendra fadnavis
| Updated on: Oct 19, 2024 | 6:52 PM

maharashtra assembly election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढला आहेत. महायुतीच्या बैठका मुंबईपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीचे नेते आमचा ८० टक्के पेपर सुटला असल्याचा दावा करत आहेत. परंतु अजूनही महायुतीची पहिली यादी आली नाही. महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित यादी येणारच नाही. प्रत्येक पक्ष आपली यादी जाहीर करणार आहे. भाजपची पहिली यादी कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीची जागावाटपची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कालही आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. ज्या अडचणीच्या जागा होत्या त्यात अर्ध्यापेक्षा जास्त जागांवर तोडगा निघाला आहे. उरलेल्या जागा दोन दिवसांत क्लिअर करू. तसेच आमचे असा ठरले आहे की क्लिअर झालेल्या जागा त्या त्या पक्षाने आपल्या सोयीने जाहीर करावे. आमची पहिली यादी कधीही येऊ शकते. लवकर येऊ शकते. आमच्या पद्धतीनुसार दिल्लीतील भाजपचे केंद्रीय मंडळ ही यादी जाहीर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जागा वाटपवर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, महायुतीची चर्चा सकारात्मक सुरु आहे. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व जागांबाबत १-२ दिवसांत निर्णय होईल. आता आमच्यात तिढा राहिलेला नाही. केवळ ३०-३५ जागांवर निर्णय बाकी आहे. तो ही लवकच होणार आहे. राज्यात तो निर्णय सुटला नाही तर गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक बैठक होईल. त्यावर त्याविषयी तोडगा निघणार आहे.

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही आगाऊ दिले आहे. आचारसंहितेची अडचणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोंबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले गेले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.