दिल्ली स्फोटानंतर मुंब्य्रातील कारवाईत एटीएसने हार्डडिस्कसह मोबाईल घेतले ताब्यात, कुटुंबियांचा गंभीर आरोप

दिल्ली लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी केलेल असतानाच आता एटीएसने मुंब्रामध्ये मोठी कारवाई करत छापेमारी केली आहे. दोन जणांना चाैकशीसठी बोलावले आहे. त्यांची कसून चाैकशी केली जातंय.

दिल्ली स्फोटानंतर मुंब्य्रातील कारवाईत एटीएसने हार्डडिस्कसह मोबाईल घेतले ताब्यात, कुटुंबियांचा गंभीर आरोप
Delhi blast
| Updated on: Nov 12, 2025 | 1:17 PM

दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली. मुंब्रात चार घरांवर छापेमारी करत त्यांनी काही वस्तू ताब्यात घेतल्या. दोन जणांना चाैकशीसाठी घेतले असून त्यांच्यापैकी एक शिक्षक आहे. दिल्लीच्या स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला. दिल्ली कार स्फोटानतंर महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्रा परिसरातून इब्राहिम आबादी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मोबाईल फोन आणि हार्डडिस्क ताब्यात घेतले असून पोलिसांकडून चाैकशी केली जात आहे. इब्राहिम आबादी याच्या पत्नीने टीव्ही9 सोबत संवाद साधला आहे.

केल्याची माहिती इब्राहिम आबादी यांच्या पत्नी यांनी दिली आहे. इब्राहिम आबादी यांच्या पत्नी सोबत संवाद साधला आहे. इब्राहिम आबादी याच्या पत्नीने म्हटल की, महाराष्ट्र एटीएसने मुंब्य्रात रात्री कारवाई केली. आमच्या संगणकाची हार्ड डिस्क आणि मोबाईल जप्त केला. आज पुन्हा चौकशीसाठी बोलवलं आहे. त्या लोकांना आम्ही विचारले तुम्ही का आले तुमच्याकडे कारवाईचे काही आदेश आहे का?. त्यांनी आम्हाला फक्त रिसिट दिली.

हार्डडिस्क आणि मोबाईल घेऊन गेले. आमची मागणी आहे की, पोलिसांनी आमच्या घरी पुन्हा येऊ नये. आम्हाला त्रास देऊ नका. मी माझे पती आणि तीन मुले आम्ही राहतो. जिहाद अस काही प्रकरण नाही. दिल्ली कार स्फोटानतंर महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्रा परिसरातून इब्राहिम आबादी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मोबाईल फोन आणि हार्डडिस्क ताब्यात घेतले असून पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती इब्राहिम आबादी यांच्या पत्नी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्रा कौसा ज्या शिक्षकाच्या घरी छापेमारी केली त्याचं नाव इब्राहिम आबिदी आहे. इब्राहिम आबिदी हा मुंब्रा कौसा येथे भाड्याने राहतो. आबिदी हा दर रविवारी कुर्लाच्या एका मस्जिदमध्ये उर्दु शिकवण्यासाठी जात होता. कुर्लामध्ये त्याची दुसरी पत्नी राहत असून तिच्या घरीही ATS ने छापेमारी केली. आता या प्रकरणात काय काय खुलासे होतात हे पाहण्यासारखे ठरेल.