AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, थेट मुंब्रातील शिक्षक ताब्यात, कुर्ला ते..

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने देशात खळबळ उडाली. त्यामध्येच या प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. देशभरात स्फोटानंतर अलर्ट जारी करण्यात आला असून ठाणे जिल्ह्यातील एका शिक्षकाला एटीएसने ताब्यात घेतलंय.

दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, थेट मुंब्रातील शिक्षक ताब्यात, कुर्ला ते..
Red Fort blast
| Updated on: Nov 12, 2025 | 11:50 AM
Share

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे कनेक्शन थेट जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात काही डॉक्टरांची नावे पुढे आली असून त्यांनी जानेवारी महिन्यातच लाल किल्ल्याची रेकी केल्याचे स्पष्ट झाले. पुलवामातील दहशतवादी उमर हा i-20 गाडी चालवत असल्याचे स्पष्ट झाले. आता स्फोटाची महाराष्ट्रापर्यंत धागेदोरे पोहोचली. मागील काही दिवसांपासून या स्फोटाचा कट रचला जात असल्याचे स्पष्ट झाले. 11 तास गाडी दिल्लीमध्ये फिरत होती. दिल्लीच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसकडून अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली असून मुंब्रातील दोन जणांना एटीएसने ताब्यात घेतलंय. चार घरांवर छापेमारी करण्यात आली. त्यांची सध्या कसून चाैकशी केली जात असून काही माहिती पुढे येण्याचे संकेत आहेत.

मुंब्रा परिसरातील एका शिक्षकाच्या घरी छापा टाकून शोध मोहीम राबवण्यात आली. पुण्यात एटीएसने ताब्यात घेतलेल्या काही आरोपींच्या चौकशीदरम्यान एका आरोपीने मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या शिक्षकाशी ओळखीचा दावा केला. एटीएस पथकाने मुंब्रा येथील कौसा विभागात असलेल्या शिक्षकाच्या निवासस्थानी छापा टाकला. यादरम्यान बराचवेळी शोध मोहिमही राबवण्यात आली. एटीएसकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर संगणक उपकरणे जप्त करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील त्याच्या निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर, एटीएस पथकाने शिक्षकाला मुंबईतील कुर्ला परिसरातील त्याच्या दुसऱ्या निवासस्थानी नेले, जिथेही शोध घेतला. पुण्यातून एटीएसने ताब्यात घेतलेल्या आरोपींचा आणि या शिक्षकाचा थेट संबंध काही नाही ना? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र एटीएसने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी आहे. त्यामध्येच एटीएसकडून मोठी कारवाई मुंब्रामध्ये केल्याने खळबळ उडाली आहे. एटीएसकडून चाैकशी केली जात आहे. दिल्ली स्फोटात थेट काही डॉक्टरांची नावे पुढे आली असून काहींना अटकही करण्यात आली. उमर याच्यासोबत या स्फोटात काही डॉक्टरांची नावे पुढे आल्यानंतर एटीएसकडून आता चाकशीसाठी थेट मुंब्र्यातील शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलंय.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंब्रा कौसा ज्या शिक्षकाच्या घरी छापेमारी केली त्याचं नाव इब्राहिम आबिदी आहे. इब्राहिम आबिदी हा मुंब्रा कौसा येथे भाड्याने रहात असल्याची माहिती. आबिदी हा दर रविवारी कुर्लाच्या एका मस्जिदमध्ये उर्दु शिकवण्यासाठी जात होता. कुर्लामध्ये त्याची दुसरी पत्नी राहत असून तिच्या घरीही ATS ने छापेमारी केली. ATS ला संशय आहे की, हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता.

ATS ने या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या असून या साहित्यांचे ॲनालिसिस केले जाणार आहे. पुण्यातील अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पुण्यातून अटक केली होती. याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केली आहे. अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट’ (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला पुणे ATS ने अटक केली होती.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.