दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाचे कनेक्शन थेट या विद्यापीठात, खळबळजनक माहिती, तब्बल 11 तास..
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर एकच खळबळ उडाली. सुरूवातीला गाडीचा स्फोट झाल्याचे दिसून आले. मात्र, तपास सुरू होताच धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. ही कार स्फोटाच्या कितीतरी तास अगोदर दिल्लीत फिरत होती.

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर एकच खळबळ उडाली. काही तासातच स्पष्ट झाले की, हा स्फोट नसून घातपात आहे. या प्रकरणात काही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबद्दल धक्कादायक खुलासे होत असून थेट पुलवामा कनेक्शन पुढे आले. i-20 मध्ये दहशतवादी उमर तोंडाला काळे मास्क लावून लावल्याचे स्पष्ट झाले. उमरच्या आईला पोलिसांनी अटक केली. उमरच्या भावाकडून तब्बल 18 मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केली असून अधिकची चाैकशी केली जात आहे. हेच नाही तर आता i-20 कारबद्दल अत्यंत खळबळ उडवणारी माहिती पुढे येतंय. ही कार तब्बल 11 तास दिल्लीमध्ये फिरत होती. या कारच्या संदर्भातील अनेक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली आहेत.
कधी पार्किंगमध्ये तर कधी विद्यापाठीमध्ये ही कार दिसून आली. मोठा घातपात करण्याचा प्रयत्न होता. मात्र, हा स्फोट घाईघाईत करण्यात आल्याचीही माहिती मिळतंय. अल फलाह विद्यापीठात ही कार आढळून आली. विद्यापीठाच्या गेटवरील सीसीटीव्हीमध्ये ही कार स्पष्ट दिसली. काही तास कार तिथेच होती. यादरम्यान गाडी उमर चालवत असल्याचेही दिसत आहे. मात्र, गाडीच्या मागील सीटवर नेमके कोण बसले हे कळू शकले नाहीये.
फरिदाबादच्या एशियन रूग्णालयाजवळही काल दिसून आली. रविवारी पहाटे ही काही पहिल्यांदा अल फलाह विद्यापीठात दिसली. त्यानंतर ब्रदापूर टोल नाका, मोदी मिल, कॅनॉट प्लेस, त्यानंतर ही काही 3.19 ते सायंकाळी 6.48 पर्यंत लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये होती. पार्किंगच्या बाहेर आल्यावरच स्फोट झाला. मागील काही दिवसांपासून दहशतवादी उमर सतत ठिकाणे बदलत असल्याचीही माहिती पुढे येतंय.
सर्वात अगोदर ही कार दिल्लीतील मोहम्मद सलमान यांनी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी ही नदीमला विकली. रॉयल कार झोन डिलरला नदीमने विकली आणि त्यानंतर ही कार उमर याने घेतल्याचे कळतंय. या स्फोटाचा कट मागील काही दिवसांपासून रचला जात होता. मात्र, या स्फोटाच्या मागे कोण हे अजूनही कळू शकले नाहीये. पोलिस या प्रकरणात कसून तपास करत आहे. 9 जणांचा जीव स्फोटात गेलाय.
