Buldhana Murder Attempt : संपत्तीच्या हव्यासापोटी दिराकडून वहिनीसह पुतणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

मंगलाबाई परिहार यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीवर त्यांचा दिर समाधान परिहार हा डोळा ठेवून असल्याने, तो वारंवार वाद घालत होता.

Buldhana Murder Attempt : संपत्तीच्या हव्यासापोटी दिराकडून वहिनीसह पुतणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
नागपूरमध्ये 250 ग्रॅम ड्रग्ज जप्तImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 2:02 AM

बुलढाणा : सख्या दिराने संपत्ती (Property)च्या लालसेपोटी आपल्या मोठ्या वहिनीसह तिच्या दोन मुलींना जिवंत जाळण्या (Burn Alive)चा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे. या घटनेत मायलेकी भाजल्याने गंभीर जखमी (Injured) झाल्या आहेत. जखमी मायलेकींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील कोनड येथे ही घटना घडली आहे. मंगलाबाई परिहार असे पीडित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी समाधान परिहारवर जाफराबाद पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भावाच्या निधनानंतर संपत्तीवर डोळा होता आरोपीचा

मंगलाबाई परिहार यांच्या पतीचे गेल्या महिन्यापूर्वी निधन झाल्याने त्या आपल्या दोन मुलींसह गावाजवळ असलेल्या त्यांच्या शेतामध्ये राहतात. मंगलाबाई परिहार यांना मुलगा नसल्यामुळे त्यांच्या संपत्तीवर त्यांचा दिर समाधान परिहार हा डोळा ठेवून असल्याने, तो वारंवार वाद घालत होता. यातूनच 2 जुलै रोजी रात्री आरोपी समाधान रामसिंग परिहार याने कट रचून तिघी मायलेकी घरामध्ये झोपलेल्या असताना रात्री 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली. याची भनक लागताच तिघी मायलेकींनी आटापिटा करत कसा बसा घरातून पळ काढला.

मात्र बाहेर येताच समाधान रामसिंग परिहार याने दोघी मायलेकींच्या अंगावर, पाठीवरील पंपाने पेट्रोल शिंपडून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मंगलाबाई परिहार तसेच पूनम परिहार या दोघी मायलेकी जळून गंभीर जखमी झाल्या. तर ज्ञानेश्वरी परिहार या छोट्या मुलीने तिथून पळ काढल्याने ती थोडक्यात बचावली. जखमी मायलेकींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना औरंगाबादला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोपी समाधान परिहारवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी मंगलाबाई परिहार यांच्या नातेवाईकांनी केली आहे. (Attempt to burn the women alive with her daughter from brother in law for property in buldhana)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.