अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान, औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याचा गळफास

अतिवृष्टीमुळे शेतीचं अतोनात नुकसान, औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याचा गळफास

औरंगाबादेतील एका तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे आत्महत्या केली आहे. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. (Aurangabad Young Farmer Suicide)

Namrata Patil

|

Sep 24, 2020 | 9:19 AM

औरंगाबाद : औरंगाबादेतील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्याने त्याने आत्महत्या केली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. (Aurangabad Young Farmer Suicide)

सुरेश रावसाहेब जंजाळ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 37 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्याने आत्महत्या केली आहे. काल (23 सप्टेंबर) दुपारी 2 वाजता त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

अनेक भागातील शेतकरी चिंताग्रस्त 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गावोगावी शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

गेल्या वर्षी पडलेला दुष्काळ, यंदा सततचा पाऊस यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही शेतकरी नापिकीला तर काही जण बँकेतील कर्ज फेडण्याची चिंता आहे. त्यात शेतमालालाही योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं असताना मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले. तसेच अनेक पिकांवर रोगाचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.(Aurangabad Young Farmer Suicide)

संबंधित बातम्या : 

काटेकोर इशारा, बिनचूक अंदाज, श्रेयापासून वंचित हवामान विभाग

कुटुंबात गृहिणीचं काम आव्हानात्मक, पण कौतुक नाही, कोर्टाने घेतली ‘तिची’ दखल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें