AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद विद्यापीठात कोर्स करायचाय? जाणून घ्या कोणते कोर्स झाले बंद, 4 नवे अभ्यासक्रम अधिक क्षमतेने सुरु होणार

विद्यार्थ्यांअभावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही अभ्यासक्रम कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 5 शैक्षणिक वर्षांत अभ्यासक्रमाच्या क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या कमी दिसून आली. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांतील विषयांसाठीच्या प्राध्यापकांची नेमणूक आणि इतर सोयीसुविधांच्या खर्चाचा बोजा विद्यापीठावर पडत होता.

औरंगाबाद विद्यापीठात कोर्स करायचाय? जाणून घ्या कोणते कोर्स झाले बंद, 4 नवे अभ्यासक्रम अधिक क्षमतेने सुरु होणार
विद्यार्थ्यांअभावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही अभ्यासक्रम कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 4:04 PM
Share

 औरंगाबाद : विद्यार्थ्यांअभावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University) काही अभ्यासक्रम कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 5 शैक्षणिक वर्षांत अभ्यासक्रमाच्या क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या कमी दिसून आली. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांतील विषयांसाठीच्या प्राध्यापकांची नेमणूक आणि इतर सोयीसुविधांच्या खर्चाचा बोजा विद्यापीठावर पडत होता. परिणामी हा खर्च कमी करण्यासाठी काही अभ्यासक्रमांना कात्री लावण्यात आली. तसेच कमी क्षमता असलेले कोर्स इतर कोर्समध्ये विलीन करण्यात आले आहेत. (11 course closed in Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Due to lack of student)

कोणते कोर्स होणार बंद…?

विद्यार्थ्यांनी कमी प्रमाणात पसंती दर्शवल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ११ कोर्सेस बंद करण्यात आले आहेत. या कोर्सेसमध्ये एमएस्सी (मॅथेमॅटिक्स), एमटेक इंजिनिअरिंग (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग), डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (डीबीएम), सर्टिफिकेट कोर्स ऑफ प्रोफीसेन्सी एन रशियन, बीए इंटरनॅशनल (जर्नालिझम अँड आर्ट अँड सायन्स युनिस्को कोर्स), बीएड, एमएड इंटिग्रेटेड कोर्स, डिप्लोमा इन टीव्ही प्रोडक्शन अँड बेसिक फिल्म मेकिंग, बॅचलर ऑफ डान्स, बीए (म्युझिक), बॅचलर ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अँड ग्राफिक्स आर्ट (बीपीटी अँड जीए), एमएससी नॅनो टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

नवे कोणते कोर्स ?

नव्या शैक्षणिक वर्षात काही जुने अभ्यासक्रम बंद करण्यासोबतच नवे अभ्यासक्रम सुरु करण्यावरही व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार २०२१-२२ एमएस्सी इन फॉरेन्सिक सायन्स, एमएस्सी इन आर्टीफिशियल इन्टेलिजन्स, एमएस्सी इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ (डीटीएल) हे अभ्यासक्रम अधिक क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत.

त्यामुळे बंद झालेल्या कोर्सेसपैकी एखाद्या अभ्यासक्रमाला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यापूर्वी नीट चौकशी करूनच निर्णय घ्यावा लागेल.

इतर बातम्या :

Maharashtra TET 2021: पुण्यात शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढली, जिल्ह्यात बालमजुरी वाढण्याचा धोका!

टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यास उरले 2 दिवस, अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर

(11 course closed in Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Due to lack of student)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.