AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिठ्ठीत लिहिले..पाठ केलेले लक्षात राहत नाही, सगळे बोलतात, मित्रही हसतात… विद्यार्थ्याच्या आत्महत्येने औरंगाबादेत हळहळ

औरंगाबाद: अभ्यासाचा अति ताण आल्याने दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना औरंगाबादमधील (Suicide in Aurangabad) सिडको एन9 परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी झोपण्यासाठी खोलीत गेलेला मुलगा शनिवारी सकाळी नऊ वाजून गेले तरी बाहेर आलाच नाही. हे लक्षात आल्यानंतर आई उठवण्यासाठी गेली असता मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. सिडको परिसरातील घटना औरंगाबादच्या सिडको […]

चिठ्ठीत लिहिले..पाठ केलेले लक्षात राहत नाही, सगळे बोलतात, मित्रही हसतात... विद्यार्थ्याच्या आत्महत्येने औरंगाबादेत हळहळ
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 2:24 PM
Share

औरंगाबाद: अभ्यासाचा अति ताण आल्याने दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना औरंगाबादमधील (Suicide in Aurangabad) सिडको एन9 परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी झोपण्यासाठी खोलीत गेलेला मुलगा शनिवारी सकाळी नऊ वाजून गेले तरी बाहेर आलाच नाही. हे लक्षात आल्यानंतर आई उठवण्यासाठी गेली असता मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले.

सिडको परिसरातील घटना

औरंगाबादच्या सिडको परिसरातील एन-९ मध्ये राहणारा निखिल इयत्ता दहावीत होता. त्याचे वडील खासगी कंपनीत आहेत, तर आई गृहिणी आहे. निखिल याला एक लहान भाऊ आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने निखिल ऑनलाइन शिक्षण घेत होता. शुक्रवारी दिवसभर ऑनलाइन क्लास आणि अभ्यास करून त्याने रात्री कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर तो खोलीत झोपण्यासाठी गेला. शनिवारी सकाळी नऊ वाजून गेले तरी निखिल खोलीतून बाहेर न आल्याने आई त्याला उठवण्यासाठी गेली. मात्र तेव्हा निखिल खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला.

चिठ्ठीत लिहिले आत्महत्येचे कारण

निखिलच्या घरातील आरडाओरडा ऐकून कुटुंबातील सदस्यांसह शेजाऱ्यांनी निखिलच्या खोलीकडे धाव घेतली. सिडको पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. निखिलला खाली उतरवून घाटीत दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत निखिलचा मृत्यू झालेला होता. शवविच्छेदनानंतर निखिलचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान निखिलने त्याच्या वहीत आत्महत्येचे कारणही लिहून ठेवले. ‘माझे दहावीचे वर्ष आहे, मात्र अभ्यास समजत नाही, पाठांतर केलेले लक्षात राहत नाही. प्रत्येक जण मला बोलतो, मित्रही हसतात…,’ ही व्यथा त्याने वहीत लिहून ठेवली. यावरून निखिल अभ्यासाच्या तणावाखाली होता, हे दिसून येते. या प्रकाराने विद्यार्थ्यांवरील मानसिक ताणाचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

देशातील सात पैकी एक नागरिक मानसिक आजाराने ग्रस्त

मानसिक आरोग्यासंबंधीच्या एका अहवालानुसार, देशातील 30 टक्के व्यक्ती नैराश्याने ग्रस्त आहेत. तर 40 टक्के व्यक्तींचा चिंतारोग (अँक्झायटी) आहे. तसेच सातपैकी एका व्यक्तीला कमी-अधिक तीव्रतेचा मानसिक आजार आहे. तरीही मानसिक आजारांचे पुरेसे गांभीर्य समाजाला तसेच सरकारला लक्षात येत असल्याचे दिसत नाही. मानसिक आजारांचे झपाट्याने वाढणार प्रमाण पाहून मानसिक आजारांना साथरोग जाहीर केली पाहिजे. नेमक्या स्थितीची शास्त्रशुद्ध चाचपणी करून ऑनलाइन-ऑफलाइन व्यापक जनजागृती मोहीम व उपाययोजना सुरु केल्या पाहिजेत. यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारने ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे, असे मत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांनी व्यक्त केले.

इतर बातम्या- 

Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी मनपाकडे व्हॅक्सिनेटर्सचा तुटवडा, सध्याची केंद्रसंख्या अपुरी

औरंगाबाद शहरात दोन देवींच्या मंदिरात कोरोना चाचणी, मोफत लसीकरणाचीही सोय, वाचा कुठे?

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.