Aurangabad Crime:  9 महिन्यात 62 गुन्ह्यांची उकल करण्यात श्वानांची मदत, औरंगाबाद पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांची कामगिरी  

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 28, 2021 | 1:32 PM

पोलीस दलातील या श्वानांनी राजस्थान, हरियाणा, पंचकुला, पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात 6 ते 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेतलेले आहे. श्वान पथकात जर्मन शेफर्ड, बेल्जियम शेफर्ड, लॅब्रोडॉर आणि डॉबरमॅन या जीतीचे श्वान आहेत.

Aurangabad Crime:  9 महिन्यात 62 गुन्ह्यांची उकल करण्यात श्वानांची मदत, औरंगाबाद पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांची कामगिरी  

औरंगाबाद: शहरात घडलेल्या खून, घरफोडी, स्फोटके व अंमली पदार्थाच्या शोधांसाठी पोलीस दलातील श्वान पथकाची मदत घेतली जाते. यावर्षी जानेवारी सप्टेंबरपर्यंत 62 घटनांमध्ये श्वानांना (Aurangabad dog squad) नेण्यात आले. त्यात श्वानांनी काढलेल्या मागावरून पोलिसांना गुन्ह्याच्या तपासाची दिशा ठरवता आली. या श्वानांमुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (Senior police officer, Auarangabad) सांगितले.

घरफोडीच्या घटनांत माग काढण्यासाठी सहाय्य

शहरातील पोलीस दलातील श्वान पथकात स्वीटी, रॉकी, आणि टिपू तसेच मोना, हेमा, लुसी आदी प्रशिक्षणधारी श्वान आहेत. शहरातील खून, खुनाचे प्रयत्न, बलात्कार, दरोडा, घरफोड्या, तसेच चरस गांजा, मॅफेड्रोन आदी अंमली पदार्थांची तस्करी आदी गुन्ह्यांमध्ये या श्वानांची मदत घेतली जाते. खून आणि घरफोडीच्या घटनांमध्ये गुन्हेगार कोणत्या दिशेने गेला असावा, याचा माग काढण्यासाठी पोलीस दलातील छावणी येथील श्वान पथकाला पाचारण केले जाते.

घातपातविरोधी तपासणीत मदत

शहरातील श्वान पथकात स्फोटक स्निफर श्वान हेमा आणि लुसी हे आहेत. व्हिआयपी दौरे आणि सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय, बसस्थानक यासारख्या गजबजलेल्या ठिकाणांची 57 वेळा घातपातविरोधी तपासणी आतापर्यंत करण्यात आली. या तपासणीमुळे हा परिसर सुरक्षित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोनाने 119 वेळा केली अंमली पदार्थांसाठी बॅगांची तपासणी

शहरात अंमली पदार्थाची तस्करी होण्याची अनेक प्रकरणे समोर येत असतात. गांजा, चरस आणि मॅफेड्रॉन, ब्राऊन शुगर यासारख्या अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. अनेकदा तस्कर एसटी बसने प्रवास करतात. ही बाब लक्षात घेऊन शोधक मोना श्वानाने तब्बल 119 वेळा बसस्थानक परिसरातील प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली आहे.

खून प्रकरणात मृताच्या बॅगपर्यंत पोहोचवले

महापालिकेजवळील चितेखाना कब्रस्तान येथील अपंग तरुण विकास देवीचंक चव्हाण याच्या खून प्रकरणात मारेकऱ्यांनी मृत व्यक्तीची बॅग घटनास्थळावरून काही अंतरावर फेकून दिली होती. मात्र श्वान पथकातील रॉकी श्वानाने घटनास्थळावरून बॅगेपर्यंत पोलिसांना नेल्यामुळे मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

कोणत्या जातीचे श्वान?

पोलीस दलातील या श्वानांनी राजस्थान, हरियाणा, पंचकुला, पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात 6 ते 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेतलेले आहे. श्वान पथकात जर्मन शेफर्ड, बेल्जियम शेफर्ड, लॅब्रोडॉर आणि डॉबरमॅन या जीतीचे श्वान असून ते आज्ञाधारक असल्याची माहिती उपनिरीक्षक बी.बी. बनसोडे यांनी दिली. तसेच प्रत्येक श्वानासाठी दोन हँडलर याप्रमाणे 12 पोलीस हवालदार कार्यरत आहेत. विविध पोलीस कर्तव्य मेळाव्यात या श्वानांनी उत्तम कामगिरी करून बक्षीसेही मिळवली आहेत. (A trained dog squad from the police force in Aurangabad helped in the detection of many crimes)

इतर बातम्या- 

Aurangabad crime: सातारा परिसरात दिवसाढवळ्या घरं फोडली, लोको पायलट आणि इंजिनिअरच्या घरात चोरी, सीसीटीव्हीत चोरटे कैद

पेट्रोल न दिल्याचा राग, औरंगाबादेत 31 वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI