औरंगाबाद: वेरूळ-अजिंठ्यासाठीची एसी पर्यटन बस पुन्हा सुरू, वेळ आणि तिकिटाचे दर काय?

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरून वेरूळची बस सकाळी 8.30 वाजता सुटते. तर अजिंठा लेणीसाठी एसी बस सकाळी 8.15 वाजता सुटते.

औरंगाबाद: वेरूळ-अजिंठ्यासाठीची एसी पर्यटन बस पुन्हा सुरू, वेळ आणि तिकिटाचे दर काय?
अजिंठा-वेरुळसाठी एसी वोल्वो बसची सेवा पूर्ववत.

औरंगाबाद: जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणीपर्यंत पर्यटकांना (Anintha-Verul Tourist) पोहचवण्यासाठी तसेच तेथील पर्यटन घडवून आणण्यासाठी एसटी महामंडळातर्फे (State Transport) जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणीसाठी चालवण्यात येणाऱ्या दोन्ही वातानुकुलित पर्यटन बस 14 ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून या बसची सुविधा बंद करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही सेवा पूर्वत करण्यात आली. या दोन बस 45 आसनी असून एसी बसमुळे विदेशी पर्यटकही यातून प्रवास करू शकतील. या बसच्या माध्यमातून एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळू शकेल.

बसची वेळ व प्रवासी भाडे

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरून वेरूळची बस सकाळी 8.30 वाजता सुटते. तर अजिंठा लेणीसाठी एसी बस सकाळी 8.15 वाजता सुटते. औरंगाबाद-वेरुळचे भाडे 275 रुपये आहे तर औरंगाबाद-अजिंठ्याचे बस भाडे 695 रुपये एवढे आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी सुविधा

औरंगाबाद शहरात देशातील तसेच विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे त्यांना अजिंठा आणि वेरूळ येथे जाण्यासाठी वातानुकुलित बस उपलब्ध असावी, या उद्देशाने एसटी महामंडळाला जिल्हा नियोजन मंडळातून सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयांचा विशेष निधी देण्यात आला होता. या निधीतून दोन वातानुकूलित बस खरेदी करण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानकातून धावणाऱ्या या दोन्ही पर्यटन बसला पर्यटकांना चांगला प्रतिदास मिळत होता. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या बसगाड्या बंद कराव्या लागल्या होत्या. या बस पुणे मार्गावर चालवल्या जात होत्या. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पर्यटन स्थळे सुरु झाली. मात्र पर्यटन बस सुरु होण्याची प्रतीक्षा होती. अखेर गुरुवारपासून या दोन्ही बस पर्यटकांसाठी पुन्हा एकदा धावणार आहेत. तसेच नवरात्रीनिमित्त मध्यवर्ती बसस्थानकातून म्हैसमाळसाठी बस सोडण्यात येत आहे. एसी बसमुळे विदेशी पर्यटकही यातून प्रवास करू शकतील. या बसच्या माध्यमातून एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळू शकेल.

कोणत्याही बसचे ऑनलाइन बुकिंग़

एसटी महामंडळाच्या संकेतस्थळासह काही मोबाइल अॅपवरूनही या बसचे बुकिंग करता येते. त्यामुळे प्रवाशांनी थेट बस स्थानकात येऊन तिकिट काढण्याऐवजी ऑनलाइन बुकिंग करण्यास प्राधान्य दिले तर प्रवास अधिक सुकर होईल. वेरूळ तसेच अजिंठ्यासाठी धावणाऱ्या एसी बसचेही ऑनलाइन आरक्षण करता येईल. प्रवाशांना public.msrtcors.com, www.msrtc.gov.in या वेबसाइटवरून अागाऊ तिकीट बुक करता येईल.

इतर बातम्या-

औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI