औरंगाबाद शहराला जोडणारा अंजना नदीवरील पूल खचला, पुरामुळे नागरिकांचे हाल

| Updated on: Oct 03, 2021 | 6:24 PM

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची परिस्थिती जास्तच भीषण आहे. जिल्ह्यातील अंजना नदीवरील पूल खचला आहे. खचलेल्या पुलावरून मुसळधार पाणी वाहत आहे.

औरंगाबाद शहराला जोडणारा अंजना नदीवरील पूल खचला, पुरामुळे नागरिकांचे हाल
सांकेतिक फोटो
Follow us on

औरंगाबाद : अतिवृष्टीने मराठवाड्यात थैमान घातले आहे. येथील नद्या दुथडी भरुन वाहत असून त्यांना पूर आला आहे. पुरामुळे अनेक रस्ते खचले आहेत. तसेच पूलदेखील वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तर ही परिस्थिती जास्तच भीषण आहे. जिल्ह्यातील उपळी गावातील अंजना नदीवरील पूल खचला आहे. खचलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

जीव धोक्यात घालून करावा लोगतोय प्रवास  

मिळालेल्या माहितीनुसार उपळी गावाच्या परिसरात असलेला अंजना नदीवरील पूल खचला आहे. पूल खचल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. पुलावरुन पाणी जात असले तरी नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत आहेत. पूल खचल्यामुळे उपळी भराडी गावाचा संपर्कही तुटला

गेल्या 8 दिवसांपासून उपळी गावाचा संपर्क तुटलेला असून प्रशासनाने नागरिकांची कोणतीही दखल घेतलेली नाही. महत्त्वाची कामे असल्यामुळे येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून तालुक्यापर्यंत पोहोचावं लागत आहे.

पिसादेवी गावाचा संपर्क तुटला

दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील पिसादेवी गावाला जोडणारा पूलही वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे पिसादेवी या गावाचा संपर्क तुटला आहे. अजूनही नदीमधील पाणीपातळी कमी झालेली नसून गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. येथे पुराच्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय.

चक्रिवादळाचा परिणाम आणखी चार दिवस

दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून मराठवाड्याला जेरीस आणलेला पाऊस आता कधी एकदा परतीच्या वाटेनं जातोय, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 6 ऑक्टोबरपासून मान्सून परतीच्या वाटेवर निघेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र मराठवाड्यात पुढील चार दिवस चक्रिवादळाचा परिणाम कायम राहील, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

इतर बातम्या :

घटक्यात कडक ऊन, घटक्यात पावसाचा धिंगाणा… काय चाललंय काय? ऑक्टोबर हीट सुरु की पावसाळाच लांबला? वाचा सविस्तर…

Photo Story: काहीच राहिलं नाही… पाणीच पाणी आहे…; देवेंद्र फडणवीसांची अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी

पाईपच्या एका बाजूने पडला तरुण, दुसऱ्या बाजूने बाहेर, पिसादेवीत थोडक्यात दुर्घटना टळली

(Anjana river bridge swept away with river water aurangabad villagers facing problems)