घटक्यात कडक ऊन, घटक्यात पावसाचा धिंगाणा… काय चाललंय काय? ऑक्टोबर हीट सुरु की पावसाळाच लांबला? वाचा सविस्तर…

03 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 04 ऑक्टोबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बिड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

घटक्यात कडक ऊन, घटक्यात पावसाचा धिंगाणा... काय चाललंय काय? ऑक्टोबर हीट सुरु की पावसाळाच लांबला? वाचा सविस्तर...
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद: सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात पावसाने चांगलीच धुळधाण उडवली. ऑक्टोबर (October) सुरु झाला तरी पाऊस आणखीच बेभान होऊन मराठवाड्यावर (Rain Marathwada) बरसतोय. गुलाब चक्रिवादळामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा (Heavy Rain) सामना करावा लागतोय. शेतातील उभी पिकं नाहीशी झालीत तर असंख्य घरांमध्ये पाणी शिकलेय. त्यातच पुढील आणखी चार दिवस पावसाचा धिंगाणा सहन करावा लागणार, अशा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मात्र दिवसाच्या सकाळपासून हवामानाचे निरीक्षण केले तर काही क्षण कडक ऊन आणि काही मिनिटांनंतरच धो-धो पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे ही ऑक्टोबर हीट (October heat) आहे की आणखी काही, असा संभ्रम निर्माण होत आहे.

सध्याचं ऊन म्हणजे ऑक्टोबर हीट?

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या मराठवाड्याला मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. मात्र या दरम्यान, पावसाळा संपत आल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात आकाश पूर्ण मोकळं होत जात. हवादेखील कोरडी होते. वातावरणात धुलीकणही खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे सूर्याची किरणं थेट जमिनीवर येतात. त्यामुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याची वाफ व्हायला सुरुवात होते. या दोन्ही प्रकराच्या उष्णतेमुळे वातावरणात अचानक उकाडा जाणवायला लागतो. यालाच ऑक्टोबर हीट असे म्हणतात. सध्या जाणवत असलेले ऊन हे ऑक्टोबर हीटच असल्याची माहिती, हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे. साधारण दहा ऑक्टोबरपर्यंत हे कडक ऊन राहिल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यानंतर वातावरणातली गर्मी कमी होऊन थंडीला सुरुवात होईल.

चक्रिवादळाचा परिणाम आणखी चार दिवस

मागील दोन महिन्यांपासून मराठवाड्याला जेरीस आणलेला पाऊस आता कधी एकदा परतीच्या वाटेनं जातोय, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 6 ऑक्टोबरपासून मान्सून परतीच्या वाटेवर निघेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र मराठवाड्यात पुढील चार दिवस चक्रिवादळाचा परिणाम कायम राहिल, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

03 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 04 ऑक्टोबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बिड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 05 ऑक्टोबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची तर औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच 06 ऑक्टोबर रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांनी दिली आहे.

इतर बातम्या-

Aurngabad Rain: औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याचा संपर्क तुटला, तिडका नदीला पूर, पाचोऱ्याला जोडणारा राज्यमार्ग बंद

Aurangabad: 1 ऑक्टोबरपासून बिलावर हवा परवाना क्रमांक, खाद्यपदार्थ विकत घेताना बाळगा सावधगिरी 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI