नांदेडच्या बड्या नेत्यावर ईडीच्या कारवाईचे चंद्रकांतदादांचे संकेत; अशोक चव्हाण म्हणतात, हा तर निवडणूक पाहून खळबळ माजवण्याचा प्रयत्न

नांदेडमधील बड्या नेत्यावर ईडीची कारवाई होण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. पाटील यांचा संपूर्ण रोख काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडे असल्याची जोरदार चर्चा होती. (ashok chavan reply to chandrakant patil over ed action statement)

नांदेडच्या बड्या नेत्यावर ईडीच्या कारवाईचे चंद्रकांतदादांचे संकेत; अशोक चव्हाण म्हणतात, हा तर निवडणूक पाहून खळबळ माजवण्याचा प्रयत्न
ashok chavan

नांदेड: नांदेडमधील बड्या नेत्यावर ईडीची कारवाई होण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. पाटील यांचा संपूर्ण रोख काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडे असल्याची जोरदार चर्चा होती. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा तर निवडणूक पाहून खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे, असं सांगत अशोक चव्हाण यांनी चंद्रकांतदादांच्या विधानाची खिल्लीच उडवली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर अशोक चव्हाण यांची मीडियाने प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी हे विधान केलं. चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? असा सवाल करत लोकशाहीत असे अपेक्षित नसल्याची खंत चव्हाण यांनी केली. निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन खळबळ माजवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला आहे. मात्र, यावर फारस भाष्य करणार नाही असे म्हणत हे सगळं राजकीय असल्याचे ते म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील हे देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. हा संवाद साधत असतानाच नांदेडमधील बड्या नेत्यांवर ईडीची किंवा आयकरची कारवाई होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. हा सवाल येताच चंद्रकांतदादा आधी हसले. त्यानंतर त्यांनी पॉझ घेतला आणि आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. मी काही तपास यंत्रणांचा अधिकारी नाही. त्यामुळे मला माहीत नाही. पण माझ्या हसण्यावरून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत नाही, असं सूचक विधान चंद्रकांतदादांनी केलं. चंद्रकांतदादांनी हे विधान करताना कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांचा संपूर्ण रोख अशोक चव्हाणांकडे असल्याने चव्हाणांची चौकशी होणार का? या चर्चेने जोर धरला आहे.

दोन व्यापाऱ्यांवर धाडी

काही महिन्यांपूर्वीच अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित दोन व्यापाऱ्यांवर ईडी आणि आयटीच्या रेड पडल्या होत्या. त्यामुळे चंद्रकांतदादांच्या या विधानाने चव्हाणांच्या गळ्याचा फास आवळला जातोय का? असा सवाल केला जात आहे.

देगलूर पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, तर वंचित आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी सहा उमेदवार अपक्ष आहेत.

देगलूर – बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवस अखेर एकूण 23 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होते. त्यातील छाननीअंती 2 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे एकूण 21 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. 13 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

 

संबंधित बातम्या:

सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

राजकारणातल्या दोन सख्ख्या मित्रांची कहाणी, दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचं नाव, मित्रत्व असावं तर असं!

आता सर्वच मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आलीय; राऊतांपाठोपाठ भास्कर जाधवही आक्रमक

(ashok chavan reply to chandrakant patil over ed action statement)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI