Aurangabad | मुंबईनंतर औरंगाबादेतही उभारणार बाळासाहेब ठाकरेंचा 51 फुटी पुतळा, महापालिकेतर्फे 9 कोटींची तरतूद!

प्रियदर्शिनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा जीआरएसमध्ये तयार करणे, तसेच आर्ट गॅलरी, साऊंड सिस्टीम, चित्रफीत, इंटेरिअर, सुशोभिकरण, पुतळा परिसरात लाइट सिस्टीम, यासह इतर कामांसाठी 1 जुलै रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Aurangabad | मुंबईनंतर औरंगाबादेतही उभारणार बाळासाहेब ठाकरेंचा 51 फुटी पुतळा, महापालिकेतर्फे 9 कोटींची तरतूद!
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 5:57 PM

औरंगाबादः मुंबईनंतर औरंगाबादमध्येही (Aurangabad) शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची योजना साकारली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व स्मृतीवनाचे काम शहरातील एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात (Priyadarshini Garden) होत आहे. या स्मृतीवनाच्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा व गॅलरीतील विविध प्रदर्शनी कामे करण्यासाठी 9.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून पूर्णाकृती पुतळा तयार करण्यासह अन्य कामांसाठी महापालिकेकडून 1 जुलै रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशसी माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

स्मृतीवनासाठी 25.50 कोटींची तरतूद

शहरातील एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व स्मृतीवन उभारण्याचे काम सुरु आहे. राज्य शासनाकडून या कामासाठी 25.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र पूर्णाकृती पुतळा व इतर कामांसाठी तरतूद कमी पडत असल्याचे पुन्हा 9.70 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली. एमजीएम परिसरातील 17 एकर जागेवर हे स्मारक आणि स्मृतीवन तयार केले जात आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई हे वारंवार या कामाचा आढावा घेत आहेत. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता बी.डी. फड, उपअभियंता आर पी राजपूत हे या प्रकल्पावर काम करत आहेत.

प्रकल्पाचे काम कुठवर?

महापालिकेने सुरु केलेल्या स्मृतीवनच्या संरक्षण भिंतींचे काम पूर्ण केले आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील अंतर्गत रस्ते व इतर प्रशासकीय स्तरावरील कामही पूर्ण होत आले आहे. येथे उभारण्यात येणारा बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा नवीन तंत्रज्ञानावर आधारीत, जीआरएसमध्ये बनवला जाणार आहे. मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचा असा पूर्णाकृती पुतळा आहे. त्यानंतर आता औरंगाबादेत असा पुतळा साकारला जाणार आहे.

25 जुलैपर्यंत निविदा स्वीकारणार

प्रियदर्शिनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा जीआरएसमध्ये तयार करणे, तसेच आर्ट गॅलरी, साऊंड सिस्टीम, चित्रफीत, इंटेरिअर, सुशोभिकरण, पुतळा परिसरात लाइट सिस्टीम, यासह इतर कामांसाठी 1 जुलै रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. 25 जुलै ही निविदा स्विकारण्याची अंतिम तारीख असून 28 जुलै रोजी निविदा उघडली जाणार आहे. तत्पुर्वी 15 जुलै रोजी निविदा भरण्यासाठी इच्छुक असलेल्या कंत्राटदारांची प्री बिड बैठक होणार असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.