Aurangabad | मराठवाड्यात डिझेल चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीचा भांडाफोड, 6 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

या परप्रांतीय टोळीने बीड जिल्ह्यात नामलगाव, गेवराई ठाणे हद्दीत दोन, माजलगान शहर ठाणे हद्दीत एक, माजलगाव ग्रामीण हद्दीत एक असे पाच गुन्हे केले. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी ठाणे हद्दीत एक आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर ठाणे हद्दीत डिझेल चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली.

Aurangabad | मराठवाड्यात डिझेल चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीचा भांडाफोड, 6 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 10:01 AM

औरंगाबादः पेट्रोल पंप (Petrol Pump) परिसरात रात्री विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनातील डिझेल आपल्या कॅनमध्ये भरत चोरून नेणाऱ्या परप्रांतीय टोळीचा बीडच्या ग्रामीण पोलिसांनी (Beed Rural police) पर्दाफाश केला आहे. जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. वाहनातील डिझेल चोरणाऱ्या या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक(Gang Arrested)  केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे सर्व आरोपी परप्रांतीय असून त्यांनी बीड, गेवराई, माजलगाव, औरंगाबाद, जालना, बदनापूर आदी ठिकाणी अनेक वाहनांच्या डिझेलवर डल्ला मारल्याचे पोलीस चौकशीअंती उघड झाले. पोलिसांनी या आरोपींकडून 6 लाख 78 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

असा झाला टोळीचा भांडाफोड

8 फेब्रुवारी 2022 रोजी पहाटे नामलगाव फाटा येथील एका पेट्रोल पंपावर उब्या असलेल्या पाच वाहनांतून तब्बल 1लाख 3 हजार 158 रुपयांचे 1,100 लीटर डिझेल चोरीला गेल्याची घटना घडली. पेट्रोल पंप व्यवस्थापक सतीश राजाभाऊ चव्हाण यांच्या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, इतरही ठिकाणांहून वाहनांतून डिझेल चोरीला जाण्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांनी तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीसांनी वेगाने तपास सुरु केला. एका ट्रक चालकाने दिलेल्या कारच्या क्रमांकावरून पोलिसांनी तपास सुरु केला आणि सात जणांची टोळी पोलिसांच्या हाती लागली. त्यांना 12 एप्रिल रोजी पहाटे जालना येथून अटक केली. त्यांच्याकडे रिकामे आणि डिझेलने भरलेल्या एकूण 37 कॅन, दोन जीप, एक दुचाकी, मोबाइल असा एकूण सहा लाख 78 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 13 एप्रिल रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टोळीतील सात आरोपींना अटक

जीपमध्ये येऊन डिझेल चोरणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली. यात सय्यद मुक्तार सय्यद करीम (जालना), खेमचंद तुलसीराम जाटो (मध्य प्रदेश), शौकत मजीद मेव, अनिल कुमार बाबूलाल, हाफीज कासम खाँ, अशोक नजीर चावरे (मध्य प्रदेश) व आवेश खान दादे खान यांचा समावेश आहे.

पाच ठिकाणी गुन्हे दाखल

या परप्रांतीय टोळीने बीड जिल्ह्यात नामलगाव, गेवराई ठाणे हद्दीत दोन, माजलगान शहर ठाणे हद्दीत एक, माजलगाव ग्रामीण हद्दीत एक असे पाच गुन्हे केले. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी ठाणे हद्दीत एक आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर ठाणे हद्दीत डिझेल चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली. दरम्यान, चोरट्यांकडून दोन स्कॉर्पिओ, पाइप व डिझेल असा 6 लाख 78 हजार 850 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

इतर बातम्या-

Textile | कापड उद्योगाला सरकारचे पाठ’बळ’ ! प्रोत्साहन योजनेत 61 प्रस्तावांना मंजुरी; 2.4 लाख नोकऱ्यांचा राजमार्ग तयार

गर्भधारणेतील ‘ही’ पाच लक्षणं आहेत अगदी सामान्य…असे होतात शारीरिक बदल

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.