AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत तीन दिवस घंटा गाडी येणार नाही! कचरा गोळा करणाऱ्यांची सामुहिक रजा, काय आहे कारण?

औरंगाबाद महापालिकेने शहरातील कचरा संकलन कामाचे दोन वर्षांपूर्वी खासगीकरण केले आहे. बंगळुरू येथील पी गोपीनाथ रेड्डी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून किमान वेतनही मिळत नसल्याची तक्रार केली आहे

औरंगाबादेत तीन दिवस घंटा गाडी येणार नाही! कचरा गोळा करणाऱ्यांची सामुहिक रजा, काय आहे कारण?
औरंगाबाद महापालिकेच्या वतीने घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जाते. Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Feb 14, 2022 | 3:35 PM
Share

औरंगाबादः शहरातील कचरा गोळा (Garbage collectors) करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सामुहिक रजा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे औरंगाबादकरांची कोंडी (Aurangabad Waste management) होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन न मिळाल्याने एकाच वेळी सर्वांनी रजेवर जाण्याचा निर्णय या संकलकांनी घेतला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजे 14, 15, 16 फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये शहरातील कोणत्याही भागातून कोणत्याही प्रकारचा कचरा उचलला जाणार नाही, अशी सूचना या कर्मचार्यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नागरिकांना (Aurangabad) कर्मचाऱ्यांच्या या सामुहिक रजेचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

कुणी थकवले वेतन?

औरंगाबाद महापालिकेने शहरातील कचरा संकलन कामाचे दोन वर्षांपूर्वी खासगीकरण केले आहे. बंगळुरू येथील पी गोपीनाथ रेड्डी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून किमान वेतनही मिळत नसल्याची तक्रार केली आहे. तसेच किमान वेतनासह गणवेश, गमबूट, आणि कचरा उचलण्यासाठीच्या इतर सुविधा देण्यात याव्यात, ही कचरा संकलकांची मागणी आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासन तसेच रेड्डी कंपनीला अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र या मागण्यांकडे गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येते. शहरात सध्या जवळपास 900 कर्मचाऱ्यांकडून कचना उचलण्यात येतो. यात काही कचरा संकलक, ड्रायव्हर आमि सुपरवायजर आहेत.

कचऱ्याचे ढीग लागण्याची शक्यता

दरम्यान, रेड्डी कंपनीकडे वारंवार विनवणी करूनही व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजे 14,15 आणि 16 फेब्रुवारी हे तीन दिवस शहरातील कचरा संकलपक, घंटागाडी कर्मचारी हे सामूहिक रजेवर जाणार आहेत. शहरात दररोज अनेक टन कटरा गोळा केला जातो. त्यामुळे येत्या तीन दिवसात शहरातील कोणत्याही भागातून कचरा संकलित केला जाणार नाही, त्यामुळे कचऱ्याचे ढीग लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर  गल्लोगल्ली फिरणाऱ्या कचरा घंटागाडीवर तीन दिवस सामूहिक रजा असलेल्या आंदोलनाचे पोस्टर लावण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Jhund first Song : अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चं पहिलं गाणं रिलीज, तीन तासात तीन लाखांपार

कुडाळमध्ये कमाल! 17 पैकी 8 जागांवर भाजप, 7 जागा शिवसेनेला, तरी नगराध्यक्षपद मात्र काँग्रेसकडे

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.