कुडाळमध्ये कमाल! 17 पैकी 8 जागांवर भाजप, 7 जागा शिवसेनेला, तरी नगराध्यक्षपद मात्र काँग्रेसकडे

कुडाळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली. करोल यांना 9 मते मिळाली, तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना 8 मते पडली. अवघे दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष बनला

कुडाळमध्ये कमाल! 17 पैकी 8 जागांवर भाजप, 7 जागा शिवसेनेला, तरी नगराध्यक्षपद मात्र काँग्रेसकडे
सिंधुदुर्गमध्ये भाजपला धक्का
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 3:15 PM

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये (Kudal Nagaradhyaksha) 17 पैकी 8 जागांवर भाजप, तर 7 जागांवर शिवसेना विजयी. म्हणजे नगराध्यक्षपदासाठी अक्षरशः कांटे की टक्करच म्हणायची. अशा वेळी कुठल्या पक्षाचा वरचष्मा राहील असं तुम्हाला वाटतं? भाजप? जागा अधिक असल्यामुळे कमळ फुलण्याची शक्यता अधिक होती, असं कोणालाही वाटणं साहजिक आहे, मात्र उत्तर चुकलं. मग, शिवसेनेने काहीतरी जुगाड करुन एक जागा कमी असतानाही नगराध्यक्षपद पटकावलं, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही पुन्हा चुकलात. कारण अवघे दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाचा (Congress) नगराध्यक्ष बनला. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळमध्ये काँग्रेसने ‘हात’ की सफाई दाखवत नगराध्यक्षपद खिशात घातले आहे.

काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष

कुडाळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली. करोल यांना 9 मते मिळाली, तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना 8 मते पडली. अवघे दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष बनला. भाजपची सत्ता काबीज करण्याची मनिषा उद्ध्वस्त करत महाविकास आघाडीने विजय पटकावला. उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे मंदार शिरसाठ यांची निवड करण्यात आली.

कुडाळमध्ये एकूण 17 पैकी 8 जागांवर भाजप, तर 7 जागांवर शिवसेना आणि 2 जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. कुडाळमध्ये कोणाचा नगराध्यक्ष बसणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर चमत्कार होईल हा भाजपचा दावा फोल ठरवत महाविकास आघाडीने कुडाळमध्ये झेंडा रोवला.

नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला धक्का

सिंधुदुर्गमधील चार नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला धक्का बसला. चारपैकी दोन नगरपंचायती महाविकास आघाडीने भाजपकडून खेचून घेतल्या. प्रतिष्ठेच्या कुडाळ नगराध्यक्ष निवडीत काँग्रेसच्या आफ्रीन करोल तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे मंदार शिरसाठ यांची निवड झाली. तर देवगड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेच्या साक्षी प्रभू नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या मिताली सावंत उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.

दुसरीकडे, दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये भाजपचे एकहाती वर्चस्व  पाहायला मिळत आहे. चेतन चव्हाण नगराध्यक्ष तर भाजपचेच देवीदास गवस उपनगराध्यक्षपदी आहेत. तर वैभववाडी मध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा माईनकर तर उपनगराध्यक्षपदी भाजपचेच संजय सावंत यांची निवड झाली.

माहूरमध्ये शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी विजयी

दुसरीकडे, तीर्थक्षेत्र माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरोज दोसानी विजयी झाले आहेत. सतरा सदस्य असलेल्या माहुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य असून शिवसेनेच्या तीन सदस्यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.

सहा सदस्य असलेल्या काँग्रेसने शिवसेनेच्या पाठिंब्याने नगराध्यक्ष पदासाठी जुळवाजुळव केली होती. पण शिवसेनेने आज राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला. तर या निवडणुकीत भाजपाचा असलेला एकमेव सदस्य तटस्थ राहिला.

संबंधित बातम्या :

झेडपी प्रारूप आरखडा आठवडाभरात होणार प्रसिद्ध; निवडणूक वेळेत होणार का?

नगरसेवकांच्या सहलीत नगरसेविकेचा मृत्यू; सुरगाणा येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच घाला

 पुणे महानगरपालिका निवडणूक; मनसे अध्यक्ष राज ठाकरे 25 तारखेला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.