AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad News: काम करताना शॉक लागून चार जण जागीच ठार; विद्युत तारांची जोडणी करताना घडली दुर्घटना

औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील (Aurangabad Kannad Taluka) हिवरखेडा नांदगीरवाडी (Hivarwadi Nandgeerwadi) येथील शिवारात विद्युत तारांची जोडणी करत असताना विजेच धक्का (Electric Shock) लागून नावडी येथील चार तरुण मजुरांचा मृत्यू (Four Emloyee Death) झाल्याची घटना घडली आहे.

Aurangabad News: काम करताना शॉक लागून चार जण जागीच ठार; विद्युत तारांची जोडणी करताना घडली दुर्घटना
Image Credit source: tv9 marathi
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jul 08, 2022 | 8:17 PM
Share

कन्नड: औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील (Aurangabad Kannad Taluka) हिवरखेडा नांदगीरवाडी (Hivarwadi Nandgeerwadi) येथील शिवारात विद्युत तारांची जोडणी करत असताना विजेच धक्का (Electric Shock) लागून नावडी येथील चार तरुण मजुरांचा मृत्यू (Four Emloyee Death) झाल्याची घटना घडली आहे. नावडी येथील हे तरुण विद्युत खांब उभा करणे, त्यावर विद्युत तारा ओढून देणे आदी वीज पुरवठासंबधी कामे करत होती. काम सुरू आसताना विद्युत पुरवठा सुरू झाल्याने विजेचा धक्का लागून नावडी येथील गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे, अर्जुन मगर हे चौघे जण जागीच ठार झाले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे बीट जमादार सतिष खोसरे, पो ना संजय आटोळे हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यानंतर मृतांचे नावडी येथील नातेवाईक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.

काम खाजगी कंत्राटदारांचे की महावितरणचे

मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई झाल्यावर नेमकी घटना कशामुळे घडली, हे काम खाजगी कंत्राटदारांचे की महावितरणचे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू

या अपघातात तरुण मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ होत आहे. काम सुरू असताना वीज प्रवाह सुरू कसा झाला असा सवाल मृतांचे नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. मृतांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी केलेला आक्रोश पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.

कारवाई कोणावर होणार

मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई झाल्यावर नेमकी घटना कशामुळे घडली हे स्पष्ट होणार आहे. चार तरूण मुले जागीच मृत्यू झाल्याने हे काम खाजगी कंत्राटदारांचे आहे की, महावितरणचे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. त्यामुळे पुढील कारवाई अजून होऊ शकली नाही.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...