Aurangabad | वीजबिल थकवणाऱ्यांना महावितरणचा धडा, शहरातल्या 22 फीडरवर लोडशेडिंग, 26 हजार कुटुंब घामाघूम

महावितरणने वीजेचे वितरण आणि वीज बिल न भरणाऱ्यांची संख्या यानुसार, ट्रान्सफॉर्मरवरून जाणाऱ्या वीजवाहिन्या अर्थात फीडरचे ए, बी, सी, डी, ई, एफ, जी-1, जी-2, जी-3 असे गट तयार केले आहेत.

Aurangabad | वीजबिल थकवणाऱ्यांना महावितरणचा धडा, शहरातल्या 22 फीडरवर लोडशेडिंग, 26 हजार कुटुंब घामाघूम
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 10:47 AM

औरंगाबादः थकलेले वीजबिल न भरलेल्या बहुसंख्य लोकांमुळे औरंगाबादच्या (Aurangabad) अनेक भागांना भारनियमनाचा (Load shading) सामना करावा लागला. शहरातील जास्त थकबाकीदार ज्या भागात आहेत, त्या ठिकाणच्या फीडरवर महावितरणतर्फे (MSEDCL) मंगळवारी अर्धा ते पाऊण तास भारनियमन करण्यात आले. शहागंज, छावणी परिसरासह क्रांती चौक, मोंढा या परिसरातील फीडरचा समावेश यात आहे. महावितरणने लोडशेडिंगचे हत्यार उपसल्यामुळे या परिसरातील तब्बल 26 हजार 400 कुटुंबीयांना काल घामाघुम व्हावे लागले. महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट सुरु असून तापमानाचा पारा चाळीशीपार पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांवर अक्षरशः घामाघूम होण्याची वेळी आली.  इतर भागातील थकबाकीचा आढावा घेऊन इतर ठिकाणीदेखील भारनियमन करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

औरंगाबादकरांची थकबाकी किती?

औरंगाबाद शहरात 3 लाख 45 हजार वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे 136 कोटी रुपयांचे वीज बिल थकलेले आहे. तसेच शहरातील सुमारे 42 हजार 449 ग्राहक कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेले आहेत. त्यांच्याकडे 229.82 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. शहरात जास्त थकबाकीदार छावणी आणि शहागंज परिसरात आहेत. आता थकबाकी वसुलीसाठी महावितरणने लॉकडाऊनचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून या कारवाईला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विविध भागातील सुमारे 22 फीडरवर केवळ अर्धा ते पाऊण तास भारनियमन केले होते. त्यामुळे 26 हजार कुटुंबियांना लोडशेडिंगचा सामना करावा लागला. आता यात आणखी काही ठिकाणांचा समावेश होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

कोणत्या फीडरवर लोडशेडिंग?

महावितरणने वीजेचे वितरण आणि वीज बिल न भरणाऱ्यांची संख्या यानुसार, ट्रान्सफॉर्मरवरून जाणाऱ्या वीजवाहिन्या अर्थात फीडरचे ए, बी, सी, डी, ई, एफ, जी-1, जी-2, जी-3 असे गट तयार केले आहेत. वीजबिल थकबाकी सर्वात कमी असणारे ए, त्यानंतर आणखी कमी बिल भरणारे बी… अशा प्रकारे वाहिन्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यानुसार, ई ते जी-3 या सर्वाधिक थकबाकी असलेल्या भागांच्या फीडरवर भारनियमन करण्यात आले. यात मोंढा, रोशनगेट, निजामोद्दीन, गणेश कॉलनी, रंगीन दरवाजासह इतर फीडरचा समावेश आहे. वीजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, अन्यथा पुढील काही दिवस लोडशेडिंग अटळ आहे, असा इशारा महावितरणतर्फे देण्यात आला आहे.

इतर बातम्या-

Nivedita Saraf: ‘अग्गंबाई सासूबाई’मधील आसावरीनंतर आता निवेदिता सराफ नव्या भूमिकेत

शिवसेना नेत्याच्या खिशातील 50 हजारांचं बंडल चोरलं, पैसे चोरतानाचा व्हिडीओ आला समोर

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.