AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | महापालिका निवडणूक मनसे ताकदीनं लढणार, पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय

या बैठकीत दिलीप बापू धोत्रे, संतोष नागरगोजे, प्रकाश महाजन यांची विशेष उपस्थिती होती. मनसेच्या नेत्यांनी शहरातील मनसेच्या ज्या नव्या शाखा उघडल्या आहेत, त्यांचा आढावा घेतला. तसेच शाखा अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांची वैयक्तीक भेट घेऊन चर्चा केली, मनसे गट अध्यक्ष निवडीचा आढावा घेतला.

Aurangabad | महापालिका निवडणूक मनसे ताकदीनं लढणार, पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय
औरंगाबादेत मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
| Updated on: Jan 31, 2022 | 4:03 PM
Share

औरंगाबादः आगामी महापालिका निवडणूक (Aurangabad municipal corporation) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Aurangabad MNS) पूर्ण ताकदीने लढविणार आहे. त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक आज 31 जानेवारी रोजी मनसेच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan), राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु असून आता मनसेनेही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या विविध प्रभागांमधून कार्यकर्त्यांचे संघटन निर्मितीवर भर दिला जात आहे. याच कार्याचा आढावा आज राज्यस्तरीय मनसेच्या नेतृत्वाकडून घेण्यात आला.

शहरातील मनसेच्या शाखांचा आढावा

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या झालेल्या या बैठकीत दिलीप बापू धोत्रे, संतोष नागरगोजे, प्रकाश महाजन यांची विशेष उपस्थिती होती. मनसेच्या नेत्यांनी शहरातील मनसेच्या ज्या नव्या शाखा उघडल्या आहेत, त्यांचा आढावा घेतला. तसेच शाखा अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांची वैयक्तीक भेट घेऊन चर्चा केली, मनसे गट अध्यक्ष निवडीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे मनसे विद्यार्थी सेना, महिला सेना, वाहतूक सेना, चित्रपट सेना, सोशल सेल या सर्व प्रमुख विभागाची सविस्तर बैठक घेण्यात आली. मनसे शहराध्यक्ष गजन गौडा आणि आशीष सुरडकर यांनी जानेवारी महिन्याचा पक्ष कार्याचा अहवाल मांडला. तसेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा नेत्यांनी आजच्या बैठकीत घेतला. या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर नेत्यांनी मनसे नवीन कार्यकारणीच्या कामाचे कौतुक केले. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त पक्ष वाढीकडे लक्ष केंद्रीत करण्याचे आणि गट अध्यक्षांचे काम वाढवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

या बैठकीत अशोक पवार पाटील,राजू जावळीकर,संकेत शेट्ये,मंगेश साळवे,राहुल पाटील,प्रशांत दहिवाडकर,सागर राजपूत,रिना राठोड,दीपाली जैन,विद्या शिंगोड, शशी खंडागळे,अविनाश पोफळे,गणेश सोळुंके, राहुल रगडे,विजय गंगावणे, जॉन बोरगे,पप्पू खरे, प्रशांत जोशी रामकृष्ण मोरे,अनिल वाने आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीत खातं खोलणार का?

औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विचार करता, आतापर्यंत शहरात मनसेने फार असा जम बसवलेला दिसलेला नाही. 2015 मधील महापालिका निवडणुकीत मनसेचा एकही नगरसेवक नाही. कारण मनसेने ही निवडणूक लढवलीच नव्हती. तत्पुर्वी म्हणजेच 2010 च्या महापालिकेत मनसेने पहिल्यांदाच खाते उघडले होते. त्यात राज गौरव वानखेडे हे नगरसेवक निवडून आले. मात्र 2014 च्या लोकसभेतील मोदी लाटेचा प्रभाव पडला आणि पालिका बरखास्त होण्याच्या आतच हे नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे महापालिकेत मनसेचा एकही सदस्य नाही. यंदा मात्र महापालिका निवडणुकांसाठी मनसेने आतापासूनच रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसे खातं उघडणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

इतर बातम्या-

Infinix चा पहिला 5G स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Cheslie Kryst Sucide : मिस अमेरिका 2019 चेस्ली क्रिस्टची आत्महत्या, 60 मजली इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलं

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....