पठ्ठ्याला बॅनरबाजी भोवली, निवडणुकीसाठी बायको पाहिजे म्हणणाऱ्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल!

भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या बॅनरवर शाई फेकून या वृत्तीचा जोरदार निषेध केला. तसेच महिला आयोगानेही या घटनेबाबत त्या पुरुषावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक लढवण्यासाठी महिलांचा असा अपमान सहन करणार नाही, असे महिलांनी ठणकावून सांगितले.

पठ्ठ्याला बॅनरबाजी भोवली, निवडणुकीसाठी बायको पाहिजे म्हणणाऱ्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल!
औरंगाबादमध्ये असे बॅनर लावणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 10:07 AM

औरंगाबादः निवडणुकीसाठी बायको पाहिजे, अशी बॅनरबाजी (Aurangabad banner) करून शहरात एकच हवा करणाऱ्या पठ्ठ्याला हा प्रकार चांगलाच महागात पडला. स्वतःला तिसरं अपत्य झाल्यानं निवडणूक (Aurangabad election) लढवता येणार नाही, त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे, असा मोठा बॅनर यानं शहरात झळकवला अन् पाहता पाहता हा राज्यात चर्चेचा विषय बनला. बातम्यांमध्ये झळकला, चॅनल्सवर आला. पण महिलांबद्दल अशा प्रकारे मजकूर लिहिल्याबद्दल हे प्रकरण त्याला चांगलंच भोवलं. या महाशयांविरोधात आता औरंगाबाद पोलिसांत (Aurangabad police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत हे महाशय?

औरंगाबादेतील तरुण रमेश विनायक पाटील असं यांचं नाव आहे. लॉकडाऊननमध्ये त्यांना तिसरे अपत्य झाले. तीन अपत्य झाल्यामुळे महापालिका निवडणूक लढता येणार नाही, मात्र ती लढवण्याची त्यांची खूप इच्छा आहे. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी थेट शहरभर बायको पाहिजे, असे लिहिलेले बॅनर लावले. बॅनरसोबत त्यांनी बायको कशी असावी, हेसुद्धा लिहिले. पाटील यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. मात्र ही बॅनरबाजी केल्यानंतर विविध समूहांकडून त्यांच्यावर टीका झाली.

महिला आयोग आक्रमक

दरम्यान, पाटील यांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पैठणगेट व गुलमंडीत हे बॅनर लावल्यानंतर संध्याकाळी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या बॅनरवर शाई फेकून या वृत्तीचा जोरदार निषेध केला. तसेच महिला आयोगानेही या घटनेबाबत त्या पुरुषावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक लढवण्यासाठी महिलांचा असा अपमान सहन करणार नाही, असे महिलांनी ठणकावून सांगितले.

बॅनरबाज पठ्ठ्यावरगुन्हा दाखल

दरम्यान, सदर रमेश विनायक पाटीलविरोधात या प्रकारामुळे क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त बॅनर लावणाऱ्या पाटील यांच्याविरोधात महापालिकेच्या तक्रारीवरून अखेर रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. महापालिकेचे अधिकारी प्रकाश आठवले यांच्या आदेशावरून स्वच्छता निरीक्षक मोहाडे यांनी पोलीस ठाण्यात पाटील यांच्याविरोधात तक्रार दिली.

इतर बातम्या-

मुंबईत आज पुन्हा धुरकट वातावरण, पुढील 48 तासांत उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट

Accident| आयशर ट्रकचा भीषण अपघात, तिघे जागीच ठार, औरंगाबादच्या शिवराई फाट्यावरची घटना

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.