AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | राज ठाकरेंची सभा ठरल्याप्रमाणेच !! 28 एप्रिलपासून पदाधिकारी औरंगाबादेत येणार, मनसे नेते नितीन सरदेसाईंची माहिती

आम्ही सगळे पदाधिकारी 28 तारखेपर्यंत औरंगाबादमध्ये पोहचू. सभेच्या एक दिवसआधी राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होतील, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली.

Aurangabad | राज ठाकरेंची सभा ठरल्याप्रमाणेच !! 28 एप्रिलपासून पदाधिकारी औरंगाबादेत येणार, मनसे नेते नितीन सरदेसाईंची माहिती
Image Credit source:
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 26, 2022 | 5:38 PM
Share

औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची येत्या महाराष्ट्र दिनी होऊ घातलेली जाहीर सभा ठरल्याप्रमाणेच होणार आहे. यात कोणताही बदल होणार नाही, असं मनसे नेते (MNS Leader) नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी स्पष्ट केलं. मुंबईत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर नितीन सरदेसाई यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. औरंगाबादमधील सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नसली तरीही काही दिवसात परवानगी मिळेल, राज ठाकरेंची सभा दणक्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शांतता राखण्यासाठी पोलिसांनी आदेश काढलेले असून त्यात मनसेला विरोध करण्याची भूमिका नसावी, असंही सरदेसाई यांनी म्हटलं.

‘राज ठाकरेंची सभा दणक्यात होणार’

औरंगाबाद येथील राज ठाकरे यांची सभा ठरल्याप्रमाणे होईल. आमचे सगळे पदाधिकारी 28 एप्रिलपासूनच औरंगाबादला जाणार आहेत. औरंगाबादमध्ये शांतता भंग करणं किंवा लॉ-ऑर्डर पालन न करणं, असं काही होणार नाही… आमची सभा अत्यंत शांततेत पार पडेल, असं वक्तव्य नितीन सरदेसाई यांनी केलं. औरंगाबादची सभा आणि आयोध्या दौरा यांच्या नियोजनासाठी आमचे सगळे पदाधिकारी कामाला लागलेत. आम्ही नकारात्मक विचार घेऊन पुढे जात नाही. सभेला परवानगी नक्कीच मिळेल, अशी आशा नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केली.

‘मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांची क्लीप पहावी’

नितीन सरदेसाई म्हणाले, ‘ काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यात ते भोंग्यांच्या संदर्भात बोलत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील ती क्लिप पहावी म्हणजे बाळासाहेबांचे भोंग्यांच्या बद्दल काय मत आहे हे मुख्यमंत्र्यांना देखील कळेल. त्यांची भूमिका बदलली असेल तर त्यांचा पक्ष तोच आहे की नाही अशी शंका निर्माण होईल. आम्ही ज्या ठिकाणी हनुमान चालीसा म्हणतोय ती बंद पाडण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न दिसतोय. हिंदुत्व असतं तर विरोध का केला असता? मुख्यमंत्र्यांनी आपल्या बोलण्याचा विचार केला पाहिजे. आपल्या बोलण्यात आणि कृतीत किती फरक आहे त्यांनी पहावं, असा सल्लाही नितीन सरदेसाई यांनी दिला.

‘ 28 एप्रिलपर्यंत सर्व पदाधिकारी औरंगाबादेत’

आम्ही सगळे पदाधिकारी 28 तारखेपर्यंत औरंगाबादमध्ये पोहचू. सभेच्या एक दिवसआधी राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होतील. राज ठाकरे आधी पुण्याला जातील आणि पुण्यावरून औरंगाबादला जातील, असं नियोजन असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.

सुहास दाशरथेंचा मनसेला सोडचिठ्ठी

औरंगाबाद मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. यावर प्रतिक्रिया देताना नितीन सरदेसाई म्हणाले, ‘ एखाद दुसरी व्यक्ती पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असेल तरी काही फरक पडत नाही. पक्ष उभारी घेतोय सगळीकडे मनसेमय वातावरण तयार झालेला आहेत.. अयोध्या वारीमुळे देशभरात देखील चर्चा सुरू झालेली आहे.’

Follow Us
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?