AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | भगवे वस्त्र, हनुमानाची तसवीर, Raj Thackeray यांच्या औरंगाबाद सभेची निमंत्रण पत्रिका तयार, बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणार?

औरंगाबादः हिंदुत्वाची आग्रही भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे  यांची औरंगाबादेत (Aurangabad MNS) होऊ घातलेली सभा अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. सभेच्या स्थळापासून ते तारीख, वेळेपर्यंत सर्वच बाबतीत अत्यंत खबरदारीपूर्वक निर्णय घेण्यात येत आहेत. संवेदनशील शहर असलेल्या औरंगाबादची शांतता ढळू न देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तर शिवसेनेचा गड मानल्या गेलेल्या औरंगाबादेत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या […]

Aurangabad | भगवे वस्त्र, हनुमानाची तसवीर, Raj Thackeray यांच्या औरंगाबाद सभेची निमंत्रण पत्रिका तयार, बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणार?
मनसेच्या आगामी सभेच्या निमंत्रण पत्रिकाImage Credit source: TV9 Marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 22, 2022 | 10:51 AM
Share

औरंगाबादः हिंदुत्वाची आग्रही भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे  यांची औरंगाबादेत (Aurangabad MNS) होऊ घातलेली सभा अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. सभेच्या स्थळापासून ते तारीख, वेळेपर्यंत सर्वच बाबतीत अत्यंत खबरदारीपूर्वक निर्णय घेण्यात येत आहेत. संवेदनशील शहर असलेल्या औरंगाबादची शांतता ढळू न देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तर शिवसेनेचा गड मानल्या गेलेल्या औरंगाबादेत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पावलावर पाऊल टाकत हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी मनसेदेखील आग्रही दिसत आहे. म्हणून राज ठाकरे यांच्या आगामी सभेच्या निमंत्रण पत्रिकेतूनही हिंदुत्वाचे मुद्दे अधिक ठळकपणे सांगण्याचे प्रयत्न केले आहेत. येत्या 01 मे रोजी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा होत आहे. खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच ही सभा होणार असून त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिका वाटपाचे काम आता मनसेच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.

भगवे वस्त्र, हनुमानाची तसवीर

मनसेच्या वतीने राज ठाकरे यांच्या आगामी सभेची निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यावरून हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पुढचे पाऊल टाकणार असेच दिसते आहे. या पत्रिकेवर भगव्या शालीत लपटलेले राज ठाकरे दिसत असून पत्रिकेवर हिंदुत्वाची पताका दिसते. भगव्या झेंड्यावर हनुमानाची तसबीर…असे या पत्रिकेचे स्वरुप आहे. आता मनसेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन या पत्रिका वाटणार आहेत.

बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणार का?

राज्यात मुंबईनंतर औरंगाबाद महापालिका ही शिवसेनेचा गड मानली जाते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील ऐतिहासिक सभादेखील खूप गाजलेल्या आहेत. त्यातच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील बाळासाहेबांच्या सभांना विशेष महत्त्व होते. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत राज ठाकरे यांनी त्याच ठिकाणी आगामी सभा आयोजित केली आहे. मशिदीवरील भोंगे काढा, हनुमान चालिसाचे पठण करा अशा इशाऱ्यांनी हिंदुत्वाचे मुद्देही लावून धरले जात आहेत. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या पावलावर राज ठाकरेंचे पाऊल पडणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंच्या सभेची तारीख बदलणार? पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना

Big News: देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न! लाल दिवा दाखवून रेल्वेवर दगडफेक;महिलेचे दागिने लंपास

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार