Aurangabad Mystery| गांधेली शिवारातील स्त्री-पुरुषाचा मृत्यू होरपळूनच! दोघांचे संबंध काय, अजून रहस्य कायम!

| Updated on: Feb 18, 2022 | 12:15 PM

कारमध्ये स्फोट का झाला, याचा अहवाल येत्या दोन दिवसात येणे अपेक्षित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे दोघांचेही कुटुंबीय एकमेकांना ओळखत नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोघांचे नेमके संबंध काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

Aurangabad Mystery| गांधेली शिवारातील स्त्री-पुरुषाचा मृत्यू होरपळूनच! दोघांचे संबंध काय, अजून रहस्य कायम!
Follow us on

औरंगाबादः शहरातील गांधेली शिवारात (Gandheli) बुधवारी दुपारी कारमध्ये महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. गांधेली शिवारात जनावरे तरणाऱ्या तरुणांना दुपारी दोन वाजता सहारा सिटीमागील परिसरात अचानक स्फोट सदृश आवाज आला. या स्फोटात कारमधील महिला आणि पुरुष जागीच ठार (Aurangabad death) झाले होते. गुरुवारी या मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले. डॉक्टरांनी या दोघांचा मृत्यू आगीत होरपळून झाल्याचे सांगितले. कारमध्ये स्फोट कसा झाला, आगीचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी आता आरटीओ आणि फॉरेन्सिक विभागाला (Forensic Department) पत्र पाठवण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात यासंबंधीचा अहवाल येणे अपेक्षित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे दोघांचेही कुटुंबीय एकमेकांना ओळखत नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोघांचे नेमके संबंध काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोण होते ते?

शहरातील बांधकाम व्यावसायिक जैन यांच्याकडे चालक असलेले रोहिदास गंगाधर आहेर (48, रा. जवाहरनगर) हे भाजीपाला आणण्यासाठी कार घेऊन बाहेर गेले होते. तर उल्कानगरीत राहणाऱ्या शालिनी सुखदेव बनसोडे (38) या सकाळी अकरा वाजता रेशनचे सामान आणण्यासाठी गेल्या होत्या. गांधेली शिवारात जनावरे चरणाऱ्या तरुणांना दुपारी दोन वाजता सहारा सिमटीमागील परिसरात अचानक स्फोटाचा आवज आला. त्यांनी ग्रामस्थांना कळवलं. तेव्हा आहेर आणि बनसोडे हे मागील सीटवर गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत आढळले. शालिनी या धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या. रोहिदास यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. पैकी दोन मुली विवाहित आहेत. तर शालिनी यांना दोन मुली, दोन मुले आहेत. दोन्ही मुलींचे विवाह झालेले आहेत. विशेष म्हणजे दोघांचेही कुटुंबीय एकमेकांना ओळखत नाहीत.

स्फोट कशाने झाला ?

घाटी रुग्णालयात गुरुवारी सदर मृतदेहांचे दोन तास पोस्टमॉर्टेम चालले. प्राथमिक अहवालात हे दोघे गंभीररित्या भाजल्याने मरण पावले, असे सांगण्यात येत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाल्या आहेत. कारमध्ये एसी, परफ्यूमचा स्फोट झाला व आगीचे लोळ व धूर ठेत त्यांच्या चेहऱ्यावर गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. गुरुवारी पोलीस त्या निष्कर्षापर्यंत पोहोचले. मात्र तज्ज्ञांच्या अहवालासाठी चिकलठाणा पोलिसांनी आरटीओ व फॉरेन्सिकला पत्र पाठवले आहे.

इतर बातम्या-

देशात सर्वात उंच शिवरायांच्या पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण, ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यास शिवप्रेमी उत्सुक!

औरंगाबादच्या वाट्याला प्रथमच 500 कोटींचा निधी, पालकमंत्री सुभाष देसाईंचा पाठपुरावा यशस्वी!