AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादच्या वाट्याला प्रथमच 500 कोटींचा निधी, पालकमंत्री सुभाष देसाईंचा पाठपुरावा यशस्वी!

औरंगाबाद जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच योजनांसाठी एवढा मोठा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी 365 वरून 385 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती.

औरंगाबादच्या वाट्याला प्रथमच 500 कोटींचा निधी, पालकमंत्री सुभाष देसाईंचा पाठपुरावा यशस्वी!
उद्योगमंत्री सुभाष देसाई
| Updated on: Feb 18, 2022 | 9:51 AM
Share

औरंगाबाद| राज्यात पहिल्यांदाच औरंगाबादच्या वाट्याला 500 कोटी रुपये एवढा निधी मिळाला आहे. राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठई 2022-23 या वर्षाकरिता 500 कोटींचा वार्षिक योजना निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी ही माहिती दिली. मागील महिन्यात औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती. दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे अनेक विकास कामे रखडल्याचे अनेकांनी नमूद केले होते. तसेच जिल्ह्यातील वाढलेली शहरी लोकसंख्या तसेच मराठवाड्यातील व इतर जिल्ह्यातील रुग्णांना शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या दर्जेदार शासकीय वैद्यकीय सेवांकडे सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री (Ajit Paawar) यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता जिल्ह्याचा वार्षिक योजना निधी 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

औरंगाबादच्या इतिहासात पहिल्यांदाच जास्त निधी!

औरंगाबाद जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच योजनांसाठी एवढा मोठा निधी देण्यात आला आहे. यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी 365 वरून 385 कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. दरवर्षीच्या निधीत 15 ते 20 कोटी रुपये वाढवून मिळतात. मात्र पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत जिल्ह्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवसेनेचे सहा आमदार असूनही फारसा निधी मिळथ नसव्याची तक्रार शिवसेनेच्या आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी हा निधी मंजूर करून देऊ, असा शब्द दिला होता आणि आता तो खरा ठरला आहे.

औरंगाबादला निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यासाठी आता 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्ह्यातील कोणत्याच विकास कामांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. शहरातील घाटी रुग्णालय हा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसाठी आरोग्य सेवेकरिता मुख्य आधार आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर जास्त निधी खर्च करणे अपेक्षित आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

इतर बातम्या-

अब्दुल सत्तार यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप, सिल्लोड न्यायालयाने दिले चौकशाचे आदेश

Yawatmal Market: ठोक मार्केटमध्ये थेट ग्राहकांची घुसखोरी, किरकोळ भाजी विक्रेत्यांनी घेतला ‘हा’ निर्णय अन् सर्वकाही ठप्प

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.