Yawatmal Market: ठोक मार्केटमध्ये थेट ग्राहकांची घुसखोरी, किरकोळ भाजी विक्रेत्यांनी घेतला ‘हा’ निर्णय अन् सर्वकाही ठप्प

शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची खरेदी होते. पण गेल्या काही दिवसांपासून येथील ठोक बाजारात ग्राहकांची घुसखोरी होत असून होलसेल दरात भाजीपाल्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शहरातील किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान होत असून ही अनोखी पध्दत बंद करावी या मागणीसाठी आता किरकोळ भाजी विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. आता यावर जिल्हा प्रशासनाकडून काय तोडगा काढला जातो हे पहावे लागणार आहे.

Yawatmal Market: ठोक मार्केटमध्ये थेट ग्राहकांची घुसखोरी, किरकोळ भाजी विक्रेत्यांनी घेतला 'हा' निर्णय अन् सर्वकाही ठप्प
यवतमाळ येथील भाजीपाल्याचे ठोक विक्री मार्केट
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 9:37 AM

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दराचे काहीही असो मात्र, ग्राहक आणि शेतकरी यांच्यातील दुवा असलेल्या भाजीपाला विक्रेत्यांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी किरकोळ विक्रेत्यांची एकजूट काय असते याचा प्रत्यय सध्या यवतमाळ येथे आला आहे. शेतकऱ्यांचा (Vegetable) भाजीपाला येथील ठोक बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो. अवघ्या काही वेळात सौदेही होतात. व्यापाऱ्यांच्या मनानेच हे सौदे होतात आणि काही वेळातच शेतकरी हा काढता पाय घेतो. त्यानंतर मात्र, शहरातील (Retail Vendor) किरकोळ विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची खरेदी होते. पण गेल्या काही दिवसांपासून येथील (Wholesale Market) ठोक बाजारात ग्राहकांची घुसखोरी होत असून होलसेल दरात भाजीपाल्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शहरातील किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान होत असून ही अनोखी पध्दत बंद करावी या मागणीसाठी आता किरकोळ भाजी विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. आता यावर जिल्हा प्रशासनाकडून काय तोडगा काढला जातो हे पहावे लागणार आहे.

किरकोळ विक्रेत्यांचे नेमके नुकसान काय?

बाजार समितीच्या ठोक बाजारातून थेट ग्राहकांना होलसेल दरामध्ये भाजीपाला मिळत आहे. शिवाय याचे प्रमाण वाढत असल्याने सकाळच्या प्रहरी ठोक बाजारपेठेत किरकोळ विक्रेत्यांपेक्षा सर्वसामान्य ग्राहकांचीच गर्दी होत आहे. त्यामुळे शहरातील गल्ली-बोळात फिरुन भाजीपाला विकूनही पदरी काही पडत नाही. परिणामी किरकोळ विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब बाजार समितीच्या निदर्शनास येऊनही कोणतेही पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे सर्व हातगाडे एका ठिकाणी लावून या विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे.

विक्रेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष

ठोक बाजार पेठेत ग्राहकांची गर्दी होत असल्याने किरकोळ विक्रेत्यांच्या भाजीपाला विक्रीवर परिणाम झाला आहे. शिवाय अपेक्षित दरातही ग्राहक भाजीपाला खरेदी करीत नाहीत. त्यामुळे किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी येथील बाजार समितीचे सभापती, जिल्हाधिकारी यांना अशा पध्दतीने भाजीपाला विक्री करु नये असे निवेदन दिले होते पण कोणतिही कारवाई ही झाली नाही. त्यामुळे अखेर विक्रेत्यांनी हा संप सुरु केला आहे. त्यामुळे काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याचे करायचे काय?

किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला विक्रीबाबत संप पुकारला असला तरी शुक्रवारी नियमितपणे शेतकरी हे भाजीपाला घेऊन मार्केटमध्ये दाखल झाले होते. मात्र, किरकोळ विक्रेत्यांनी व्यापाऱ्यांकडून भाजीपाल्याची खरेदीच केली नव्हती. त्यामुळे या भाजीपाल्याचे काय होणार हा प्रश्न आहे. ग्राहकांना आता थेट ठोक बाजारपेठेत जाऊनच खेरदी करावी लागणार आहे. सर्वच ग्राहक हे बाजारपेठेत जाणार नसल्याने भाजीपाला शिल्लक राहणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या :

4 हेक्टर शेतातून लाखोंचं उत्पादन, युवा शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग; अमरावतीच्या शेतकऱ्याचं कौतुक

मटण म्हणलं की तोंडाला पाणी सुटलंच समजा, पण उस्मानाबादी मटण म्हणजे… आss..हाss..हाss..!

17 हजार शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचा लाभ, शेतीच्या जोडव्यवसायाला मिळणार आधार

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.