“ज्यांनी उद्धवजींच्या डोळ्यात पाणी दिले, त्या शत्रूला सोडणार नाही”; ठाकरे गटाने शिवसेनेच्या नेत्यांना थेट इशारा दिला

ज्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात ज्यांनी पाणी आणले आहे. त्या शत्रूला आता सोडणार नाही असा थेट इशाराच ठाकरे गटाच्या महिला नेत्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिवसेना हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

ज्यांनी उद्धवजींच्या डोळ्यात पाणी दिले, त्या शत्रूला सोडणार नाही; ठाकरे गटाने शिवसेनेच्या नेत्यांना थेट इशारा दिला
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 6:10 PM

औरंगाबादः शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यापासून ठाकरे गटाकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आणले, त्या शत्रूला सोडणार नाही असा इशारा ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करण्याबरोबरच नुकताच प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटावर आणि सुषमा अंधारे यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. त्यांच्यावर निशाणा साधताना त्यांनाही यावेळी इशारा देण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर यांच्यावर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी टीका केली होती. त्याबद्दल बोलतानाही त्या म्हणाल्या की, मी पोडियमवर भाषण केलं नाही, मला पोडियमच्यावर तरी उंची द्यायची मात्र देवाने दिली नाही मात्र विचाराची उंची जास्त असायला हवी असा टोला त्यांनी टीका करणाऱ्यांना लगावला आहे.

ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, पदावर असताना बंगला म्हणजे आमचा बंगला वाटत होता.

मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे व सुषमा अंधारे यांच्यावर बोचरी टीका केली होती.

त्यांच्या टीकेला प्रत्युतर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, प्रमोद महाजन सोडून बाकीचे महाजन हे नाव घेण्याच्या लायकीचेही नाहीत असा टोला त्यांनी प्रकाश महाजन यांना लगावला आहे. प्रकाश महाजन यांनी परत अशी गुस्ताखी केली तर वयाचा मुलजिमा ठेवला जाणार नाही.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करताना त्यांनी मी अनेक राज्यपाल पाहिले पण मी दूध विकणारा राज्यपाल कधीच पाहिला नाही असा टोला त्यांनी कोश्यारी यांना लगावला आहे.

तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्गगार काढतान त्या म्हणाल्या उत्कृष्ट जगातील, देशातील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाव कमावले आहे.

कसबा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. त्या निकालाविषयी बोलताना आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगत उद्याचा निकाल लागला की एक एक पिस कसं काढायचं याची तयारीच करा असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपण डोक्यावर कफन बांधूनच काम करतो आहे. त्यामुळे शिवरायांची शपथ घेउन सांगते की कुठलेही वाईट काम केले नाही पण आम्ही ठाकरे ब्रँड सोबत आहोत म्हणून त्रास दिला जातो आहे अशी टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली आहे.

ज्यांनी उद्धवज ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आणले त्या शत्रूला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर आमची मशाल यांच्या बुडाला लागणार आहे आणि यांना टेकू दिले जाणार नाही असा जोरदार टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.