AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत लाचखोरीविरोधात आणखी एक कारवाई, सा. बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या मुसक्या आवळल्या, काय आहे प्रकरण?

कंत्राटदाराने बिलाची मागणी केली असता जुन्या कामाचे नव्या दराने बिल काढतो, असे आश्वासन देत चार लाखांचे बिल जवळपास सहा लाखांपर्यंत नेण्यासाठी व ते मंजूर करण्यासाठी पैसे मागितले. याविरोधात तक्रारदाराने 11 मार्च रोजी एसीबीकडे तक्रार केली. शुक्रवारी पथकाने याबाबत शहानिशी केली.

औरंगाबादेत लाचखोरीविरोधात आणखी एक कारवाई, सा. बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या मुसक्या आवळल्या, काय आहे प्रकरण?
सांकेतिक छायाचित्रImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 14, 2022 | 11:51 AM
Share

औरंगाबादः जिल्हा प्रशासनात भ्रष्टाचार बोकाळला आहे, असा आरोप काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केला होता. त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातील (Aurangabad District) सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यानेच लाच घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने (ACB) या अभियंत्याला रंगेहाथ पकडले आहे. औरंगाबाद शहरातील एका समाजिक सभागृहाचे साडे सहा लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी सव्वा लाख रुपयांची लाच अभियंत्याने मागितली होती. ही लाच स्वीकारतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता संजय राजाराम पाटील याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

काय आहे नेमके प्रकरण?

शहरातील मुकुंदनगर येथील मारुती मंदिराच्या सभागृहाचे आमदार निधीतून बांधकाम करण्याचे टेंडर वाय पी डेव्हलपर्स यांना मिळाले होते. या कंत्राटदाराने दोन वर्षांपूर्वी सभागृहाचे काम पूर्ण केले. परंतु निधी अभावी आणि लॉकडाऊनमुळे बिलाचे काम प्रलंबित राहिले. तीन महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता पाटील याची भेट घेऊन निधीची मागणी केली. त्यानंतर पाटील याने सभागृहाची पाहणी केली. काही त्रुटी काढल्या. 50 हजाराचे अधिकचे काम करण्याच्या सूचना केल्या. हे काम केल्यानंतर कंत्राटदाराने बिलाची मागणी केली असता जुन्या कामाचे नव्या दराने बिल काढतो, असे आश्वासन देत चार लाखांचे बिल जवळपास सहा लाखांपर्यंत नेण्यासाठी व ते मंजूर करण्यासाठी पैसे मागितले. याविरोधात तक्रारदाराने 11 मार्च रोजी एसीबीकडे तक्रार केली. शुक्रवारी पथकाने याबाबत शहानिशी केली.

असा रचला सापळा

शुक्रवारी तक्रार दाखल झाल्यानंतर शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुटी होती. त्यामुळे अभियंता पाटील याने तक्रारदाराला उल्का नगरीतील घराजनळ पैसे घेऊन बोलावले. त्यावर तक्ररा दाराने एवढे पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा 50 हजार रुपये घेऊन या, असे अभियंत्याने म्हटले. त्याच वेळी एसीबीचे अधिकारी, कर्मचारी रस्त्याच्या दोन्ही बाजूने दबा धरून बसले होते. दुपारी तीन वाजता पाटीलने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या पथकात अंमलदार दिगंबर पाठक, शिरीष वाघ, अशोक नागरगोजे, चंद्रकांत बागूल यांचा समावेश होता. शहरात 24 जुलै 2021 रोजी सहाय्यक अधीक्षक अभियंता असलेल्या महिलेस दहा हजार रुपयांची लाच घेताना अचक झाली होती. त्यानंतर चालू वर्षात एसीबीच्या पथकाद्वारे सहा कारवाया झाल्या, त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यावरील ही पहिलीच कारवाई आहे.

इतर बातम्या-

क्रिती सेननला हेवी गाऊन आवरेना…, सिद्धार्थ मल्होत्राने केली मदत, पाहा फोटो…

सत्ताधारी-विरोधक महाभारतासारखे उभे ठाकलेत, मविआ नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर, शिवसेना नेते संजय राऊतांची टीका

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली