AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | हिजाब गर्ल मुस्कानच्या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांची आडकाठी, वंचित आघाडीची कोर्टात धाव, वाद पेटणार?

पोलिसांच्या या कारवाईविरोधात वंचित आघाडीच्या नेत्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. एकूणच, सुरुवातीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप विरुद्ध वंचित असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता पोलीस विरोधात वंचित असाही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Aurangabad | हिजाब गर्ल मुस्कानच्या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांची आडकाठी, वंचित आघाडीची कोर्टात धाव, वाद पेटणार?
हिजाब गर्ल मुस्कान खान हिच्या सत्कारावरून औरंगाबादेत वातावरण तापलं.
| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 11:02 AM
Share

औरंगाबादः हिजाब गर्ल मुस्कान खान (Hijab Girl Muskan khan) हिच्या सत्कार समारंभावरून औरंगाबादचं वातावरण चांगलंच पेटलं आहे. आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने मुस्कान खान हिचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला आहे. संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे शहरात आगमन झाले आहे.  दोन दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने या कार्यक्रमाला आक्षेप घेतला होता. या कार्यक्रम होऊ नये, असे पत्रही पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर भाजपचा विरोधा काहीसा मावळलेला दिसतानाच आता पोलिसांनी या कार्यक्रमाला आडकाठी घातली आहे. शहरातील आमखास मैदानावर या सत्कार सोहळ्याचे नियोजन कऱण्यात आले असून पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली असून पोलीस आणि वंचित आघाडी असा संघर्ष आज पहायला मिळणार आहे. त्यामुळे औरंगाबादचं वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कर्नाटकमध्ये हिजाब घालण्यावरून सुरु झालेल्या वाद थंड झाला असताना, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कर्नाटकात चर्चेत आलेल्या मुस्कान खान हिचा सत्कार समारंभ औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे नियोजन असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे शहरात आगमन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी या कार्यक्रमाला भाजपच्या वतीने या कार्यक्रमाला विरोध केला होता. हा कार्यक्रम झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा भाजप नेते संजय केणेकर यांनी दिला होता. आज सोमवारी भाजपचा विरोध काहीसा मावळलेला दिसत असतानाच पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

वंचित आघाडीची कोर्टात धाव

दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही आमखास मैदानावर आयोजित केलेला हा कार्यक्रम त्याच वेळेत आणि त्याच ठिकाणावर घेणार, असा ठाम निर्णय वंचित आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात वंचित आघाडीच्या नेत्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. एकूणच, सुरुवातीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप विरुद्ध वंचित असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता पोलीस विरोधात वंचित असाही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इतर बातम्या-

Ind vs SL 2nd Test: तिसऱ्या दिवशी पिंक बॉल टेस्टचा निकाल निश्चित, टीम इंडिया विजयापासून 9 विकेट दूर

रेल्वेचा मोठा निर्णय, आता प्रवाशांना जनरल तिकीटावरही करता येणार प्रवास; ‘या’ गाड्यांचा समावेश

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.