राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता, पण शरद पवार ‘असा’ निर्णय घेतील, डॉ. भागवत कराड यांचं मोठं वक्तव्य

भाजपने शिवसेना जशी फोडली तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरु आहे. पक्ष सोडण्यासाठी आमदारांवर दबाव आणला जातोय, असं वक्तव्य संजय राऊत यांनीही केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता, पण शरद पवार 'असा' निर्णय घेतील, डॉ. भागवत कराड यांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 11:22 AM

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय. भाजपात येण्यासाठी माझ्या कुटुंबियांवर दबाव आणला जातोय, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी मोठं वक्तव्य केलंय. शरद पवार मोठे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे, हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे, असं मी म्हणणार नाही. पण देशाच्या विकासासाठी शरद पवार योग्य निर्णय घेतील, असं भागवत कराड म्हणालेत. एकिकडे शिंदे गटातील आमदारांच्या डोक्यावर टांगती तलवार असतानाच अजित पवार भाजपशी सलगी करण्याच्या चर्चांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर डॉ. भागवत कराड यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं ठरतं.

सगळेच अस्वस्थ

नागपूरमध्ये झालेल्या वज्रमूठ सभेवरून डॉ. कराड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ तीन विचाराचे पक्ष एकत्र येऊन वज्रमुठ सभा घेत आहेत. हे सत्तेसाठी एकत्र येत आहेत पण यांचे विचार एक नाहीत. हे फिजिकली सोबत असले तरी मेंटली हे लोक एकत्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या सभा यशस्वी होणार नाहीत. फक्त अजित पावरच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे सेना यांच्यात अस्वस्थता आहे. विचार एक नसल्यामुळे ही अस्वस्थता आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अस्वस्थता आहे ती अस्वस्थता कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण देशाच्या विकासासाठी शरद पवार योग्य निर्णय घेतील.

दानवेंच्या मागे शिवसेनेत काय बोलतात?

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सध्या शिंदे-भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. यावरून डॉ. भागवत कराड यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, ‘ अंबादास दानवे यांना ते लहान होते तेव्हापासून मी ओळखतो. त्यांच्या शिवसेनेतले त्यांच्या मागे किती बोलतात हे मला माहिती आहे. त्यांच्या मागे शिवसेना किती आहे याचीही मला कल्पना आहे, असं खोचक वक्तव्य त्यांनी केलंय.

राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न- संजय राऊत

भाजपने शिवसेना जशी फोडली तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरु आहे. पक्ष सोडण्यासाठी आमदारांवर दबाव आणला जातोय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. काँग्रेस नेते के सी वेणूगोपाल आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर दबाव आहे. या दबावामुळे ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी निर्णय घ्यावा, असं शरद पवार यांनी भेटीत सांगितल्याचा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केलाय.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.